ज्योतीकुमार बलात्कार-खून आरोपींना फाशी

पुण्यात खळबळ उडवून देणाऱ्या ज्योतीकुमारी चौधरीच्या बलात्कार आणि खून प्रकरणातल्या आरोपींना आज शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात कॅब ड्रायव्हर पुरुषोत्तम बोराडे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाडे यांना दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Updated: Mar 20, 2012, 04:02 PM IST

www.24taas.com, पुणे

पुण्यात खळबळ उडवून देणाऱ्या ज्योतीकुमारी चौधरीच्या बलात्कार आणि खून प्रकरणातल्या आरोपींना आज शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात कॅब ड्रायव्हर पुरुषोत्तम बोराडे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाडे यांना दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली आहे.

बलात्कार आणि खून याप्रकरणी दोन्ही आरोपींना दुहेरी फाशीची शिक्षा सुनविण्यात आली आहे. तसचं अपहरण आणि हत्येचा प्रयत्न यासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल सुनावला आहे.

या खटल्यात आरोपींना दोषी ठरवण्यात आलं असून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. मल्टी नॅशनल कंपनीत काम करणाऱ्या ज्योतीकुमारी चौधरी या २५ वर्षांच्या तरुणीवर १ नोव्हेंबर २००७ला बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. हिंजवडीतल्या विप्रो कंपनीत ज्योती काम करत होती. नाईट शिफ्टला जाण्यासाठी निघालेली ज्योती रात्री दहाच्या सुमारास कॅबमध्ये बसली होती.

मात्र, कॅब कंपनीकडे नेण्याऐवजी कॅबचा ड्रायव्हर पुरुषोत्तम बोराडे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाडेनं ज्योतीकुमारीला जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर निर्जनस्थळी नेलं. आणि तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी कौशल्यानं तपास करत कॅब ड्रायव्हर पुरुषोत्तम बोराडे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाटेला अटक केली होती.  हा खटला पुणे सत्र न्यायालयात सुरु होता.