शनिमहाराजांना दोन कोटींचा सोन्याचा मुखवटा

शिर्डीच्या साईबाबांप्रमाणेच आता शनि शिंगणापूर येथील जागृत आणि स्वयंभू मूर्ति असलेल्या शनि देवाला प्रथमच किमती वस्तूचं दान करण्यात आलं आहे. साडे चार किलो वजनाचा सोन्याचा मुखवटा एका शनि भक्ताने शनिदेवाला अर्पण केला आहे.

Updated: Jun 7, 2012, 09:52 AM IST

www.24taas.com, शनि शिंगणापूर

शिर्डीच्या साईबाबांप्रमाणेच आता शनि शिंगणापूर येथील जागृत आणि स्वयंभू मूर्ति असलेल्या शनि देवाला प्रथमच किमती वस्तूचं दान करण्यात आलं आहे. साडे चार किलो वजनाचा सोन्याचा मुखवटा एका शनि भक्ताने शनिदेवाला अर्पण केला आहे.

मुखवटयातील मुकुटावर शनि देवांना प्रिय असलेला नीलम हिरा ही मढवण्यात आला आहे. मुखवटयाची किंमत दोन कोटीच्या वर आहे. शनि  शिंगणापूर देवस्थानच्या इतिहासात  एवढ्या  मोठ्या किंमतीची भेट वस्तु संस्थानला प्रथमच मिळाली आहे. आणि त्याचमुळे संस्थानवर सुरक्षेची जबाबदारीही वाढली आहे.

देवस्थानने सध्या हा मुकुट सोनई इथल्या एक बँकेत सेफ डिपॉजिट लाँकर  मध्ये ठेवला आहे. वर्षातून एकदाच शनि जयंतीच्या महापूजेसाठी हा मुखवटा मूर्तिवर चढवण्यात येणार आहे. त्यामुळे उत्सव काळात शनि देवांची मूर्तिही आता शिर्डीच्या साईबाबांच्या मूर्तिप्रमाणे झळाळून  निघणार आहे.