नारायण राणेंची कोलांटउडी, ऊर्जा प्रकल्प नकोत

नारायण राणेंनी आपली भूमिका बदलत यापुढे औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना विरोध करणार असल्याचं सांगितलंय.

Updated: Nov 4, 2011, 04:54 AM IST

झी २४ तास वेब टीम, रत्नागिरी

 

कोकणात ऊर्जाप्रकल्पांसाठी आग्रही राहणा-या उद्योगमंत्री नारायण राणेंनी आपली भूमिका बदलत यापुढे औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना विरोध करणार असल्याचं सांगितलंय.

 

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प वगळता कोकणात औष्णिक ऊर्जा प्रकल्प नको अशी भूमिका त्यांनी मंडणगडमध्ये जाहीर केली.  निवडणुका समोर असल्यानं राणे पिता-पुत्र सध्या रत्नागिरी जिल्ह्यात तालुकानिहाय दौरा करीत आहेत.

 

उर्जा प्रकल्पांना स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन राणेंनी आपली भूमिका बदललीय आहे. रत्नागिरीत शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादीचे राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्याशी राणेंचा सामना आहे. त्यामुळे नीलेश राणेंनी थेट भास्कर जाधवांनाच टीकेचं लक्ष्य केलं आहे.