नारायण राणेंचा अजित पवारांवर 'प्रहार'

राज्यातलं वीज संकटावरुन विरोधकांकडून राष्ट्रवादीचे नेते आणि ऊर्जामंत्री अजित पवारांवर टीका होत असतानाच आता उद्योगमंत्री नारायण राणेंनीही अजितदादांवर प्रहार केलाय.

Updated: Nov 5, 2011, 01:25 PM IST

झी २४ तास वेब टीम, रत्नागिरी

 

राज्यातलं वीज संकटावरुन विरोधकांकडून राष्ट्रवादीचे नेते आणि ऊर्जामंत्री अजित पवारांवर टीका होत असतानाच आता उद्योगमंत्री नारायण राणेंनीही अजितदादांवर प्रहार केलाय.

 

जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाची आपल्यामुळंच उभारणी होत असल्याचा दावा राणेंनी केलायं. अजित पवारांचे नाव टाळत एकही राष्ट्रवादीवाला अजून जैतापूरला का गेला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. जिल्ह्याचा पालक तसंच कोणीही मिजास करु नये, राष्ट्रवादीची ताकद पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद काय आहे, ते  सर्वांना कळेल,  असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

तर  शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे उध्वस्त ठाकरे आहेत, अशा शब्दांत राणेंना उद्धव ठाकरेंवर टीका केली. शिवसेनेनं ४० वर्षांत जे कमावलं ते उद्धव ठाकरेंनी गमावलं, अशा शब्दांत राणे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय.