अण्णांच्या समर्थनार्थ वसईत रॅली

वसईत अण्णा हजारेंच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली होती. वसई-विरार आणि नालासोपारा या सर्व ठिकाणी एकाच वेळी ही रॅली काढण्यात आली होती. ‘भारत के लिए आखरी जंग’ असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून कार्यकर्ते देत होते.

Updated: Dec 26, 2011, 09:43 AM IST

झी २४ तास वेब टीम, वसई

 

वसईत अण्णा हजारेंच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली होती. वसई-विरार आणि नालासोपारा या सर्व ठिकाणी एकाच वेळी ही रॅली काढण्यात आली होती.

 

वसईच्या अंबाडी रोडवरून ही रॅली काढण्यात आली होती. मोटारसायकल, टेम्पोच्या सहाय्यानं संपूर्ण तालुक्यात ही रॅली फिरवण्यात आली होती. यावेळी लोकांना अण्णा हजारेंच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत होतं.

 

‘भारत के लिए आखरी जंग’ असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून कार्यकर्ते देत होते. तर अण्णांसोबत वसईतही जेल भरो करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. ह्या आंदोलनाला मात्र लोकांचा प्रतिसाद कमी प्रमाणात मिळाल्याचं दिसत होतं.

 

[jwplayer mediaid="18595"]