www.24taas.com, नवी दिल्ली
समाजवादी पार्टीचे माजी खासदार शाहीद सिद्दीकी यांना नरेंद्र मोदींची मुलाखत घेणं चांगलच महागत पडल्याचं दिसतंय. सपानं सिद्दीकी यांची हकालपट्टी केलीये.
‘पक्षाशी त्यांचा काहीही संबंध नाही... पक्षाचे ते सदस्य नाहीत’ असा खुलासा सपाचे महासचिव रामगोपाल यादव यांनी केलाय. सिद्दीकी यांनी ऊर्दू साप्ताहिकासाठी गुजरातचे मुख्यमंत्री मोदी यांची मुलाखत घेतली होती. गुजरात दंगल प्रकरणी मी दोषी असेन तर मला फाशी द्या, असं आवाहन मोदींनी या मुलाखतीत केलं होतं. काँग्रेसनं या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला होता. शाहीद सिद्दीकी यांनी मोदींची ही विशेष मुलाखत घेणे, सपाच्या नेत्यांना रुचलं नाही. पक्षाशी सिद्दीकी यांचा काहीही संबंध नसल्याचं रामगोपाल यादव यांनी स्पष्ट केलं असलं तरी काही महिन्यांपूर्वीचं पक्षाच्या बैठकीला सिद्दीकी उपस्थित होते, असा दावा केला जातोय.
.