मान्सूनची पुन्हा प्रतिक्षा

पावसाची प्रतिक्षा करणा-या राज्यातील जनतेला पुढील पाच दिवस तरी दिलासा मिळण्याची शक्यता नाही. पुढील पाच दिवस पावसाची अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

Updated: Jul 16, 2012, 01:25 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

पावसाची प्रतिक्षा करणा-या राज्यातील जनतेला पुढील पाच दिवस तरी दिलासा मिळण्याची शक्यता नाही. पुढील पाच दिवस पावसाची अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

 

अरबी समुद्रावरुन येणारा मान्सून सध्या कमकुवत झाला आहे. मान्सून जोपर्यंत स्ट्रॉग होत नाही तोपर्यन्त पावसाची स्थिती अशीच राहील. मध्य महाराष्ट्रात सरासरी पोक्षा ४० टक्के पाउस कमी झाला आहे त्याचबोरबर मुंबइकरांनाही जोरदार पावसासाठी वाट पहावी लागणार आहे. मात्र स तर त्या खालोखोल मराठवाड्यात ३४ टक्के विदर्भआत २१ टक्के आणि कोकणात १२ टक्के कमी पाउस झाला आहे. त्यामुळे पावसाची प्रतिक्षआ करणा-या सांगली साता-यातील दुष्काळी पट्टया बरोबरच पुणेकरांनाही ४  ते पाच दिवस पावसासाठी वाट पाहावी लागणार आहे.

 

मान्सूनची या वर्षीची तूट जुलै महिन्यात कायम राहणार असून मान्सूनचे अंदाज चुकण्याची दाट शक्‍यता असल्याचे हवामान खात्याने आज सोमवारी म्हटले आहे.  हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये तापमानात बदल होऊन  'एल निनो' इफेक्‍ट जाणवण्याची शक्‍यता आहे. भात लागवड सुरू असलेल्या भागांमध्ये येत्या काही दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. परंतु, कर्नाटक आणि ईशान्य भारतात मॉन्सूनची तूट कायम राहील अशी चिन्हे आहेत. गुजरातमध्ये तेलबियांचे क्षेत्र असलेल्या परिसरातही पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्‍यता आहे.

 

पुण्यात महाआरती

लांबलेल्या पावसानं सगळ्यांनाच चिंता आहे. पाऊस पडावा म्हणून पुणेकरांनी देवाचा धावा सुरु केलाय. पावसाचे आगमन लवकर व्हावे म्हणून महाआरती करण्यात आली. नेहरु मित्रमंडळाच्या वतीनं या महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पाणीसंकट दूर व्हावं यासाठी वरुणराजाला साकडं घालण्यात आलं