www.24taas.com, खन्ना
३० जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्यालाही मतदान करण्याचा नागरी हक्क मिळावा यासाठी पाकिस्तानातल्या पंजाबमध्ये राहाणाऱ्या हिंदू कुटुंबानी सोमवारी आवाज उठवला.
"अजूनही आम्हाला नागरी हक्क मिळाले नाहीत. आमच्याकडे रेशन कार्ड, लायसन्स, मतदार कार्ड, घर, नोकरी काहीच नाही. त्यामुळे आम्हाला खूपत्रास सहन करावा लागतो.” असं आता पंजाबमध्ये राहाणाऱ्या एका पाकिस्तानी हिंदूने सांगितलं.
"पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हालाही मतदान करण्याचा अधिकार मिळावा. आम्ही स्वतःला भारतीयच समजतो.” असं तो पाकिस्तानी हिंदू म्हणाला. मूळचे पाकिस्तानी हिंदू असणारे फळविक्रेते पुजारीलाल म्हणाले की मी आणि माझं कुटुंब येऊ घातलेल्या मतदानात सामील होऊ इच्छित आहे. मात्र, आम्हाला अद्याप कोणतेही अधिकार मिळालेले नाहीत.
राजपूरा येथे राहाणाऱ्या काही कुटुंबानी सांगितलं की आम्ही इतके वर्षं इथे राहूनसुद्धा अजूनही आम्हाला भारतीय नागरीकांचे अधिकार मिळाले नाहीत. पोलिसांच्या परवानगीशिवाय आम्ही शहर सोडून कुठे जाऊ शकत नाही.
यासंदर्भात राजपुरा पोलिसांना विचारलं असता ते म्हणाले, “ते लोक भारतात योग्य तो प्रवासी व्हिसा घेऊन आले होते. पण, आता ते पुन्हा पाकिस्तानास जायला तयार नाहीत. त्यांना पाकिस्तानी सरकार आणि कोर्ट चांगली वागणूक देत नाही.”