'टीम अण्णा'मधून मुफ्ती काझमी बाहेर

नॉएडात टीम अण्णांची बैठक सुरु असतानाच त्यात फूट पडली. आंदोलनात सुरुवातीपासून असलेले मुफ्ती शगूम काझमी बाहेर पडले आहेत. टीम अण्णांचे काही सदस्य काही मुद्द्यांचे राजकारण करत असल्याचा आरोप काझमी यांनी केलाय.

Updated: Apr 22, 2012, 06:50 PM IST

www.24taas.com, नॉएडा

 

नॉएडात टीम अण्णांची बैठक सुरु असतानाच त्यात फूट पडली. आंदोलनात सुरुवातीपासून असलेले मुफ्ती शगूम काझमी बाहेर पडले आहेत. टीम अण्णांचे काही सदस्य काही मुद्द्यांचे राजकारण करत असल्याचा आरोप काझमी यांनी केलाय. मुस्लिमांकडं दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

 

तर टीम अण्णांनी मात्र काझमींना हटवल्याचा दावा केलाय. बैठकीचं रेकॉर्डिंग करुन ते बाहेर देत असल्याचा टीम अण्णांचा आरोप आहे. अण्णा देशभर दौरा करणार असल्याचं टीम अण्णांच्यावतीनं सांगण्यात आलं.

 

दरम्यान टीम अण्णांच्या बैठकीत बाबा रामदेव यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यावरून मतभेद निर्माण झाले होते. टीम अण्णाच्या काही सदस्यांनी संयुक्त आंदोलनाला विरोध केल्याचं माहिती सूत्रांनी दिली.