अण्णा-बाबांच्या आंदोलनाला विरोध

बाबा रामदेव यांच्यासह आंदोलन करण्याबाबत टीम अण्णांमधील मतभेद एकदा समोर आलेत. बाबा रामदेव आणि अण्णांच्या एकत्र आंदोलनाला टीम अण्णांमधील काही सदस्यांचा विरोध आहे.

Updated: Apr 22, 2012, 03:18 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

बाबा रामदेव यांच्यासह आंदोलन करण्याबाबत टीम अण्णांमधील मतभेद एकदा समोर आलेत. बाबा रामदेव आणि अण्णांच्या एकत्र आंदोलनाला टीम अण्णांमधील काही सदस्यांचा विरोध आहे.

टीम अण्णांच्या बैठकीत शांती भूषण, प्रशांत भूषण आणि किरण बेदींनी त्यांच्या एकत्र आंदोलनाला विरोध दर्शवलाय. टीम अण्णांची बैठक नोएडात सुरू आहे. दोनच दिवसांपूर्वी अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांनी एकाच मंचावर येऊन एकत्र आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर आता बाबा रामदेव आणि अण्णा हजारे यांच्या आंदोलनाबाबत एकमत नसल्याचं उघड झालंय.

अण्णांशी हातमिळवणी केलेले बाबा रामदेव मे मध्ये छत्तीसगढच्या दुर्गवरून काळ्या पैशांवर आंदोलनाची सुरूवात करणारेत तर अण्णा हजारे शिर्डीहून लोकायुक्ताच्या मुद्यावरून आंदोलन छेडणारेत.

[jwplayer mediaid="87603"]

Tags: