www.24taas.com, नवी दिल्ली
लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांच्या जन्मतारखेच्या मुद्द्यावरून झालेला वाद आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. या वादावर कायमचा पडदा टाकण्यासाठी केंद्र सरकारने ३० डिसेंबर २०११ मध्ये काढलेला आदेश मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांच्या जन्मतारीखेच्या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी केंद्र सरकारने ३० डिसेंबर २०११ मध्ये काढलेला आदेश मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशात सरकारने सिंह यांची जन्म तारीख १० मे १९५० असल्याचे स्पष्ट केले होते. या निर्णयामुळे केंद्र सरकार बॅकफूटवर गेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत सरकारला अधिसूचनेवर आजपर्यंत (१० फेब्रुवारी) निर्णय घेण्यास सांगितले होते. अखेर सरकारने आज हा आदेश मागे घेतला.
केंद्रीय संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी ३० डिसेंबरला हा आदेश काढीत जनरल व्ही. के. सिंह यांची जन्मतारिख १० मे १९५० असल्याचे स्पष्ट केले होते. आता केंद्र सरकारने आदेश मागे घेतल्याने सरकार व्ही. के. सिंह यांच्याशी चर्चेस तयार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आणखी संबंधित बातमी
लष्करप्रमुख जन्मतारीख वाद : सुनावणी पुढं ढकलली