चंद्र पृथ्वीच्या भेटीला

उद्या चंद्र पृथ्वीजवळ येणार आहे. त्यामुळे रविवारी चंद्र आकारमानाने मोठा दिसेल. या घटनेला सुपरमून संबोधले जाते. भारतीय वेळेनुसार रविवारी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी हे अंतर ३ लाख ५६ हजार ९५५ किमी असेल. खगोलप्रेमींना रविवारी पहाटे पश्‍चिम क्षितिजावर अस्ताला जाणारा चंद्रही पाहता येईल.

Updated: May 5, 2012, 02:15 PM IST

www.24taas.com, हैदराबाद

उद्या चंद्र पृथ्वीजवळ येणार आहे. त्यामुळे रविवारी चंद्र आकारमानाने मोठा दिसेल. या घटनेला सुपरमून संबोधले जाते. भारतीय वेळेनुसार रविवारी सकाळी ९ वाजून ५  मिनिटांनी हे अंतर ३ लाख ५६ हजार ९५५ किमी असेल. खगोलप्रेमींना रविवारी पहाटे पश्‍चिम क्षितिजावर अस्ताला जाणारा चंद्रही पाहता येईल.

या कॅलेंडर वर्षातील इतर सर्व पौर्णिमांच्या तुलनेत रविवारच्या बुद्घपौर्णिमेचा चंद्र आकाराने मोठा असेल; तेव्हा तो पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल.   खगोलप्रेमींना रविवारी पहाटे पश्‍चिम क्षितिजावर अस्ताला जाणारा चंद्रही पाहता येईल. मळभ मुंबईच्या एखाद्या समुद्रकिनाऱ्यावरून या चंद्राचे दर्शन घेता येईल. या दिवशी पहाटे ५.५९ वाजता चंद्रास्त होईल आणि पुन्हा सायंकाळी ७.२७ वाजता चंद्रोदय झाल्यापासून त्याचे रूपडे डोळे भरून पाहता येईल.

समुद्रात भरती-ओहोटी येण्यामागे चंद्र आणि सूर्याचे गुरुत्वाकर्षण कारणीभूत असते. सुपरमूनच्या वेळी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत असतात. तसेच या वेळी चंद्र पृथ्वीच्या किंचित जवळ आल्याने भरती थोडी जास्त असते. या घटनेमुळे शनिवारी सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी, रात्री ९  वाजून ४० मिनिटांनी आणि ६ मे रोजी सकाळी ११  वाजून ९ मिनिटांनी मोठी भरती येईल, असे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या संचालकांनी सांगितले आहे.  समुद्र किनारपट्टीच्या भागात त्यामुळे सावधगिरी बाळगावी, असे आवाहन राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने केले आहे.