सचिनला नाही १०० क्र. आसन, रेखापासून दूर जया बच्चन

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर राज्यसभेत १०३ क्रमांकाच्या सीटने आपल्या राजकीय खेळीची सुरूवात करणार आहे. विजय माल्या आणि शेतीशास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांच्यामधली जागा मास्टर ब्लास्टरला देण्यात आली आहे.

Updated: May 4, 2012, 08:59 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर राज्यसभेत १०३ क्रमांकाच्या सीटने आपल्या राजकीय खेळीची सुरूवात करणार आहे. विजय माल्या आणि शेतीशास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांच्यामधली जागा मास्टर ब्लास्टरला देण्यात आली आहे. दरम्यान, जया बच्चन यांच्या विनंतीनंतर त्यांचा आसन बदलून 91 वरून 143 क्रमांकाचं आसन मिळवला आहे. तर रेखाला 99 क्रमांकाचं आसन मिळाला आहे. त्यामुळे सिलसिला या चित्रपटातील सहकलाकारांचा राज्यसभेत आमना-सामना होण्याची शक्यता मालवली आहे.

 

बॉलिवुडच्या प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांना राज्यसभेत ९९ क्रमांकाची जागा देण्यात आली आहे. ही जागा जया बच्चन यांच्या मागे आहे. म्हणजे पुढील रांगेत ९१ आणि मागील रांगेत ९९ अशी आसान व्यवस्था आहे. त्यामुळे जया बच्चन यांनी रेखा यांच्याशी आमना-सामना टाळण्यासाठी आपला आसन क्रमांक ९१ वरून १४३ करून घेतला आहे. ७० च्या दशकात रेखा आणि जया बच्चन यांचे पती अमिताभ बच्चन यांच्या रोमान्सच्या अफवा उठल्या होत्या. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा उकरून कोणी काढू नये, यासाठी जया बच्चन यांनी हा बदल करून घेतल्याचे समजते आहे.

 

 

जया बच्चन यांनी आपल्या पक्षाचे सदस्य किरणमय नंदा यांच्याशी आपला आसन क्रमांक बदलण्याची विनंती केली होती. त्यानंतर समाजवादी पक्षाने सर्व सदस्यांचे आसन क्रमांक बदलण्याचा निर्णय घेतला आहे.