कोलकताः आगीत ८९ जणांचा मृत्यू

कोलकाता येथील एएमआरआय हॉस्पिटला आग लागून आतापर्यंत ८० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत आणखी काही रूग्ण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Updated: Dec 9, 2011, 02:34 PM IST

झी २४ तास वेब टीम, कोलकाता
कोलकाता येथील एएमआरआय हॉस्पिटला आग लागून आतापर्यंत ८९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत आणखी काही  रूग्ण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

 

कोलकातामध्ये एएमआरआय हॉस्पिटलला भीषण आग लागली. मृतांमध्ये रुग्ण आणि हॉस्पिटलच्या कर्मचा-यांचा समावेश आहे. हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये आधी आग लागली. त्यानंतर संपूर्ण हॉस्पिटलाच  आगीनं विळखा घातला. घटनास्थळी अग्निशमन दलाचे २५ पेक्षा जास्त बंब पोचले होते.  शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागल्याचं सांगण्यात येतंय.

दरम्यान, घटनास्थळाला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भेट दिली. मात्र, यावेळी गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात अनेक जण जखमी आलेत.