अण्णांचा नव्याने ब्लॉग सुरू

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा पहिला ब्लॉग दोन आठवड्यांपूर्वी बंद करण्यात आला होता. आता अण्णांनी नव्याने ब्लॉग सुरू केला आहे. त्याचा पत्ता मात्र बदलला आहे.

Updated: Nov 24, 2011, 03:21 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा पहिला ब्लॉग दोन आठवड्यांपूर्वी बंद करण्यात आला होता. आता अण्णांनी नव्याने ब्लॉग सुरू केला आहे. त्याचा पत्ता मात्र बदलला आहे.

 

 

अण्णांचा राजू परुळेकर यांच्या मदतीने ब्लॉग सुरू केलेला होता. हा ब्लॉक वादाच्या भोवऱ्यात हॅंग झाला. 'टीम अण्णा'चे सदस्य अरविंद केजरीवाल, किरण बेदी  आणि प्रशांत भूषण यांचे  मतभेद झाले आहेत. 'टीम अण्णा' अण्णांचा वापर करून घेत आहे, असी आरोप परुळेकरांनी केले होता. या सर्व गोंधळात अखेर 'अण्णा हजारे सेज्‌डॉट वर्डप्रेस डॉट कॉम' या पत्त्यावरील अण्णांचा ब्लॉग बंद करण्यात आला.

 

 

नव्याने सुरू करण्यात आलेल्या   ब्लॉगचे 'अण्णा हजारे सेज्‌' हे शीर्षक कायम असले तरी नवीन ब्लॉग भ्रष्टाचारविरोधी चळवळीमागची संस्था असलेल्या  'इंडिया अगेन्स्ट करप्शन'च्या संकेतस्थळावर सुरू करण्यात आला आहे. अण्णांच्या आधीच्या ब्लॉगवर मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये नोंदी प्रसिद्ध केल्या जात होत्या; तर नवीन ब्लॉगवर केवळ हिंदी व इंग्रजीमध्येच नोंदी प्रसिद्ध झाल्या आहेत एवढाच काय तो फरक आहे.

 

 

देशाच्या विकासामध्ये गावांचे स्थान महत्त्वाचे आहे. सुरवात म्हणून देशाच्या विविध भागांमध्ये शंभर आदर्श गावे निर्माण करणे आवश्‍यक आहे, असे अण्णांनी ब्लॉगवरील आपल्या नवीन नोंदीत म्हटले आहे. आदर्श गावांची निर्मिती केली पाहिजे. गांधीजींनी सक्षम स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहिले होते. त्यांचा संदेश होता, की खेड्यांकडे चला. जोपर्यंत गावे स्वयंभू व स्वयंप्रशासित होत नाहीत तोपर्यंत सक्षम भारत निर्माण होणार नाही.