नागपूरची झेडपी निवडणूक

नागपूर जिल्हा परिषदेच्या ५९ जागांकरीता ३११ उमेदवार आपले नशिब अजमावत आहेत. तर ११८ पचांयत समित्यासाठी ५९७ उमेदवार रिंगणात आहे. एकूण २,२५२ मतदान केंद्रावर २८०० मतदानयंत्रात उमेदवारांचा कौल ठऱणार आहे.

Updated: Feb 7, 2012, 01:13 PM IST

www.24taas.com, नागपूर

 

नागपूर जिल्हा परिषदेच्या ५९ जागांकरीता ३११ उमेदवार आपले नशिब अजमावत आहेत. तर ११८ पंचायत समित्यांसाठी ५९७ उमेदवार रिंगणात आहे. एकूण २,२५२ मतदान केंद्रावर २८०० मतदानयंत्रात उमेदवारांचा कौल ठऱणार आहे.

 

नागपूरच्या निवडणूकीत भाजपाचे राष्ट्रीय़ अध्यक्ष नितीन गडकरी आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर चंद्रपुरातही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीच्या मतदानाला प्रारंभ झाला आहे. चंद्रपुरात जिल्हा परिषदच्या ५७ आणि पंचायत समितीच्या ११४ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. भाजप आणि काँग्रेस अशा आघाडी करत जिल्हा परिषदेवर सत्ता होती.

 

यावेळी मात्र साऱ्याच पक्षांनी एकहाती सत्तेसाठी जोरदार प्रचार केला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर आर पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मनगुंटीवार या सर्वानी जोरदार प्रचारसभा घेतल्या होत्या.