सलमान-कंगना में कुछ खास है- इति नेहा धुपिया

बॉलिवूडमध्ये गॉसिपिंग या साथीच्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. आपल्या सहकलाकारांबद्दल बेधडकपणे अफवा पसरवण्याची संसर्गजन्य साथीमुळे बॉलिवूडमधले दिग्गज त्रस्त झाले आहेत. शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राच्या अफेअर असल्याच्या गावगप्पांच्या मागे निलम असल्याचं नुकतचं उघडकीस आलं.

Updated: Jan 12, 2012, 08:26 PM IST

www.24taas.com, मुंबई
बॉलिवूडमध्ये गॉसिपिंग या साथीच्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. आपल्या सहकलाकारांबद्दल बेधडकपणे अफवा पसरवण्याच्या संसर्गजन्य साथीमुळे बॉलिवूडमधले दिग्गज त्रस्त झाले आहेत. शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राच्या अफेअर असल्याच्या गावगप्पांच्या मागे निलम असल्याचं नुकतचं उघडकीस आलं.

 

आता नेहा धूपियाने सलमान खान आणि कंगना राणावतमध्ये काही खास घडल्याची कंडी पिकवली. नुकतचं एका कार्यक्रमाच्या निमित्ताने कंगना, नेहा आणि सलमान हैदराबादला गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर परत येताना नेहाने सलमान आणि कंगनामध्ये आधल्या रात्री काहीतरी घडल्याची पूडी सोडली. आता नेहाला गप्प बसवण्याचा प्रयत्न काही जणांनी करुन पाहिला पण तिच्या पोटातलं ओठावर आल्या शिवाय तिला राहवलं नाही. नेहाने सर्वांना सांगण्यास सुरवात केली की तिने कंगनाला सलमानच्या रुममध्ये जाताना रंगेहाथ पकडलं आणि या दोघांनी रात्री खुप धमाल केली असल्याची तिला खात्री पटली आहे.

 

आता कंगना आणि सलमान गेल्या काही काळात खुप जवळचे मित्र-मैत्रिण झाले आहेत. पण नेहाच्या दाव्यात तथ्यांश किती हा मात्र प्रश्न आहे. पण सलमान खानच्या वाटेला जाणं चांगलं नाही इतकचा सल्ला नेहाला कुणीतरी दिला पाहिजे.