'डॉन-२' ४१ देशांमध्ये होणार प्रदर्शित

'डॉन-२: द किंग ईज बॅक' हा एकाच वेळेस ४१ देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा शहारुख खान मेगा इव्हेंट असा चित्रपट आहे. अनेक वर्षांपासून प्रतिक्षा असलेला चित्रपट ४१ देशांमध्ये प्रदर्शित होत असल्याने शहारूखसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated: Dec 21, 2011, 08:45 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

'डॉन-२: द किंग ईज बॅक' हा एकाच वेळेस ४१ देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा शहारुख खान मेगा इव्हेंट असा चित्रपट आहे. अनेक वर्षांपासून प्रतिक्षा असलेला चित्रपट ४१ देशांमध्ये प्रदर्शित होत असल्याने शहारूखसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

हा चित्रपट फरहानच्या पहिल्या 'डॉन- द चेस बिगिन्स अगेन' (२००६) चा पुढील भाग असणार आहे. बॉक्स ऑफिसवर १९७८ ला प्रचंड यश मिळविलेला अमिताभ बच्चनचा 'डॉन' या चित्रपटाचा 'डॉन - द चेस बिगिन्स अगेन' हा रिमेक होता. 'डॉन-२' या प्रदर्शन तारखेच्या दोन दिवस आगोदरच यु.के. मध्ये प्रदर्शित होणार असून २३ डिसेंबरला भारताबरोबरच इतर संपूर्ण देशात प्रदर्शित होईल.

तसेत हा चित्रपट २३ डिसेंबर रोजी २डी तसेच ३डी या दोन्ही प्रकारात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्याच बरोबर दक्षिण भारतातील प्रेक्षकवर्गासाठी तमीळ आणि तेलगू या भाषांमध्ये सुध्दा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

फरहान अख्तरच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट ४१ देशात प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर केले असताना, फरहानने ट्वीटरवर सांगितले की, आता हे देश डॉनला पकडायला बाहेर पडतील. ज्याप्रमाणे हिंदी चित्रपटांना प्रेक्षक पसंती दर्शवतात हे पाहून मला खरच अभिमान वाटतो अशी भावना फरहानने व्यक्त केली.