7 दशकांपूर्वीच्या व्हायरसची मुंबईत एन्ट्री, देशातल्या सर्व राज्यांना अलर्ट... जाणून घ्या किती धोकादायक

पावसाळ्यात साथीच्या आजाराने मुंबईत थैमान घातलं आहे. मलेरिया, गॅस्ट्रो, लेप्टोच्या आजाराच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहेत. त्यातच एका धोकदायक व्हायरसची मुंबईत एन्ट्री झालीय. यामुळे चिंता आणखी वाढलीय. देशातल्या सर्व राज्यांना अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 26, 2023, 04:00 PM IST
7 दशकांपूर्वीच्या व्हायरसची मुंबईत एन्ट्री, देशातल्या सर्व राज्यांना अलर्ट... जाणून घ्या किती धोकादायक title=

Zika virus Alert:देशभरात कोरोना व्हायररसचा (Corona) प्रसार आटोक्यात आला आहे. एखाद-दुसऱं प्रकरण समोर येत असतानाच आता एका जुन्हा व्हायरसने चिंता वाढवली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत या व्हायरसचा रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून देशातील सर्व राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मुंबईतल्या चेंबूर भागात झीका व्हायरसचा(Zika Virus) रुग्ण आढळून आला आहे. या आजारात ताप येण्याबरोबरच अंगावर लाल चट्टे उठतात. याशिवाय डोकेदुखी, डोळे लाल होणं अशी लक्षणंही दिसून येतात. काही वेळा एका आठवडयाहून अधिक काळ ही लक्षणं दिसून येतात. 

दिल्लीसह इतर राज्यांना अलर्ट
मुंबईतल्या चेंबूर परिसरात राहाणाऱ्या एका व्यक्तीला झीका व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. उपचारानंतर या व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती आरोग्यविभागाने दिली आहे. पण या प्रकरणामुळे चिंता वाढली आहे. हा व्हायरस पसरू नये यासाठी खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, दिल्लीसह सर्व राज्यांना अलर्ट (Alert) जारी केलं आहे. 

कसा पसरतो हा व्हायरस?
झिका विषाणू प्रामुख्याने एडिस डास चावल्याने पसरतो. एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस डासांच्या चावण्याल्याने माणसाला याची लागण होते. या आजाराचा सर्वाधिक धोक हा गर्भवती महिलांना असतो. गर्भवती महिला आणि त्यांच्या बाळांवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

झीकाची लक्षण
झीाक व्हायरस गंभीर नसला तरी काळजी घेण्याची गरज आहे. यात रुग्णांना ताप येणं हे मुख्य लक्षण मानलं जातं. पण औषधांमुळे हा आजार बरा होऊ शकतो. रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासत नाही. पण झिका विषाणूचा संसर्ग रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे डासांपासून स्वत:चे संरक्षण करणं हा आहे. 

7 दशकं जुना व्हायरस
1947 साली युगांडात या व्हायरसचा उगम झाल्याचं बोललं जातं. युगांडाच्या झिका जंगलात आढळून आलेला हा व्हायरस माकडांमधून माणसात दाखल झाल्याचं सांगितलं जातं.1952 साली पहिल्यांदाच झिका व्हायरसची नोंद घेतली गेली.