मुंबई : भायखळा तुरूंगात महिला कैदी मंजूला शेट्येंच्या मृत्यूप्रकरणी ६ पोलिसांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ज्या महिला कैद्यांनी जेलच्या छतावर चढून आंदोलन करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आलेत.
या महिला कैद्यांमध्ये बहुचर्चित शिणा बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीवर गुन्हा झाला आहे.
सर्व महिला कैद्यांवर दंगा करणे, मारहाण करणे अशा प्रकारचे हे गुन्हे दाखल झालेत. शुक्रवारी रात्री मंजूला शेट्येचा महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. पण त्याची माहिती देण्यास प्रशासनानं टाळाटाळ केली. त्यानंतर महिला कैद्यांनी आंदोलन करून जेलप्रशासनानं मंजूलाला मारहाण केल्यावर तिचा मृत्यू झाल्याचा आरोप केला.
दरम्यान जेल विभागाचे वरिष्ठ अधिकारी राज्यवर्धन यांच्या कार्यालयाला याविषयाची कल्पनाही नव्हती असं माहिती देण्यात आली.