निवडणूक की आंदोलन? सुकाणू समितीच्या नेत्यांमध्येच मतभेद

 राज्य सरकारनं शनिवारी शेतक-यांसाठी ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर शेतकरी आंदोनलकर्त्यांच्या सुकाणू समितीची मुंबईत रविवारी दुपारी बैठक झाली. या बैठकीनंतर सुकाणू समितीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत, सुकाणू समितीतल्या नेत्यांचे मतभेद समोर आले.

Updated: Jun 26, 2017, 10:27 AM IST
निवडणूक की आंदोलन? सुकाणू समितीच्या नेत्यांमध्येच मतभेद title=

मुंबई : राज्य सरकारनं शनिवारी शेतक-यांसाठी ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर शेतकरी आंदोनलकर्त्यांच्या सुकाणू समितीची मुंबईत रविवारी दुपारी बैठक झाली. या बैठकीनंतर सुकाणू समितीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत, सुकाणू समितीतल्या नेत्यांचे मतभेद समोर आले.

सरकारची कर्जमाफी अमान्य असल्याचं, सुकाणू समितीच्या नेत्यांनी सांगितलं. त्यानंतर आपले हक्क मिळवण्यासाठी राजकारणात उतरुन निवडणूक लढणार असल्याचं, सुकाणू समितीच्या नेत्यांनी सांगितलं. त्याचवेळी सुकाणू समितीच्या दुस-या नेत्यांनी मात्र त्याला विरोध केला.