पालघर : पालघर जिल्ह्यातील बोर्डी रेल्वेवरील उड्डाणपुलाचे काम चालू असताना अचानक आलेल्या वाऱ्याने सर्व गर्डर पलटी झाल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. ९० फूट लांब लोखंडी गर्डर टाकण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील बोर्डी रोड रेल्वे स्थानकात बारा ते दोन दरम्यान ब्लॉक घेण्यात आला होता. दोन वाजता काम पूर्ण होऊन रेल्वे वाहतूकही सुरू करण्यात आली. मात्र इतक्यात जोरदार वारा सुटल्यानं सर्व गर्डर आडवे पडले. सुदैवाने ते खाली आले नाहीत. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
या घटनेत ४ कामगार किरकोळ जखमी झाले असून गर्डरच क्रेनच्या साह्याने काम सुरू असून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी किती वेळ जाईल याबाबत कोणीही अधिकारी बोलण्यास तयार नाही.