Thane Water Cutting : मुंबईत मंगळवार 19 मार्च 2024 पासून मुंबई महानगर पाणीपुरवठा विभागाकडून 15 टक्के पाणीकपात करण्यात आलंय. आता ठाणेकरांना पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. बुधवारी 20 मार्च 2024 ला ठाणे शहरातील काही भागांमध्ये पाणीकपात करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम हाती घेतल्यामुळे 12 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे शहरात होणाऱ्या पाणी पुरठ्यात 30 टक्के कपात होणार आहे. त्यात शहराच्या काही भागात बुधवारी 12 तासांसाठी पाणी पुरवठा बंद असणार आहे. त्याशिवाय पाणी पुरवठा पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांवर पाणी टंचाईचं संकट ऐन उन्हाळ्यात ओढवलंय. (Water cut in Thane city on Wednesday 20 March 2024 Water channel will be closed for 12 hours)
ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून होणारा 250 दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा बुधवारी जलवाहिनी स्थलांतरित कामासाठी बंद ठेवणार आहेत. त्यामुळे शहरात 30 टक्के कमी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. बुधवार, 20 मार्चला सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा आणि ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असं आवाहन महापालिकेने ठाणेकरांना केलंय.