सावधान! मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरताहेत 'हे' विषारी जलचर

त्यांनी दंश केल्यास शरीरात तात्काळ विष भिनायला सुरुवात होते.

Updated: Jul 30, 2018, 04:27 PM IST
 सावधान!  मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरताहेत 'हे' विषारी जलचर title=

मुंबई: मुंबईच्या सागरी किनाऱ्यावर गेल्या काही दिवसांपासून ब्लु बॉटल हे जलचर सातत्याने दृष्टीस पडत आहेत. छत्रीसारखा आकार असलेले निळ्या रंगाचे एक ते दोन इंची ब्लु बॉटल अभ्यासकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहेत. मात्र, ब्लु बॉटल विषारी असल्याने त्यांच्यापासून धोकाही आहे. 
 
 ब्लु बॉटलच्या शरीराला दोऱ्यासदृश अवयव असतो. त्यांनी दंश केल्यास शरीरात तात्काळ विष भिनायला सुरुवात होते. यामुळे वेदना असह्य होऊन शरीरावर लाल रंगाचे व्रण उठतात. पावसाच्या दिवसात सागरी वारे जमिनीकडे वाहत असल्याने हे ब्लु बॉटल्स सागरी किनाऱ्यालगत येतात. गिरगाव आणि जुहू चौपाटीवर सध्या मोठ्या संख्येने ब्लु बॉटल पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी पावसाच्या दिवसात समुद्रात उतरताना सावधनता बाळगण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.