केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली सलीम खान यांची भेट

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आज संपर्क फॉर समर्थन या मोहिमेअंतर्गत चित्रपट आणि संवाद लेखक सलीम खान यांची भेट घेतली.

Updated: Jun 8, 2018, 09:16 PM IST
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली सलीम खान यांची भेट title=

मुंबई : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आज संपर्क फॉर समर्थन या मोहिमेअंतर्गत चित्रपट आणि संवाद लेखक सलीम खान यांची भेट घेतली. सलीम खान यांच्या वांद्रेमधल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधल्या घरी ही भेट झाली. यावेळी अभिनेता सलमान खानही उपस्थित होता. त्यानंतर गडकरी संपर्क फॉर समर्थन या मोहिमेअंतर्गत अभिनेता नाना पाटेकर यांचीही भेट घेणार आहेत.

त्याआधी काल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने आणि उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली होती. त्यानंतर सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर दोन तास बंद दाराआड चर्चा केली. ही चर्चा राजकीय होती की युतीबाबत होती, याबाबत अधिक तपशिल जाहीर करण्यात आलेला नाही.