मुंबई: मरोळ परिसरात शुक्रवारी अस्लम खान या भंगार व्यवसायिकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या गोळीबारात अस्लम खान गंभीररित्या जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्लम खान यांच्यावर काल रात्री दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या दोघांनीही तोंडावर मास्क घातले होते. गोळीबार करुन दोघेही फरार झाले. या हल्ल्यामागेच नेमके कारण समजू शकलेले नाही. आम्ही गुन्हा नोंदवला असून सध्या या सगळ्याचा तपास सुरु आहे. आम्ही अस्लम खान आणि त्यांच्या नातेवाईकांची चौकशी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Mumbai: Unidentified masked men shot at a scrap dealer late last night in Marol area. The man has been taken to a hospital. Police say 'We are registering an attempt to murder case. Investigation is underway. We are inquiring the man and his relatives.' pic.twitter.com/EoQ6XBmWJK
— ANI (@ANI) August 4, 2018
मुंबईच्या अंधेरील्या मरोळ परिसरात ही घटना घडलीय. दोन अज्ञात हल्लेखोर एका भंगार व्यापाऱ्यावर गोळीबार करुन फरार झाले. असलम वली खान नावाचा हा व्यापारी आपल्या कारनं घरी पोहचला. त्यावेळी तिथे दबा धरुन बसलेल्या या दोन अज्ञात हल्लेखोरांनी या व्यापाऱ्यावर दोन राऊंड फायर केल्या. यात एक गोळी या व्यापाऱ्याच्या पोटात लागली तर दुसरी गोळी चुकली. या घटनेनंतर या व्यापाऱ्याला नजीकच्या नागरिकांनी होली स्पिरीट रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्याच्या पोटातली गोळी काढण्यात डॉक्टरांना यश आलंय. आता या व्यापाऱ्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत.