मुंबईतील ऐतिहासिक इमारतींना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा

देशातील सर्वात जास्त वारसा स्थळांचा मान असलेले महाराष्ट्र एकमेव राज्य

Updated: Jun 30, 2018, 10:41 PM IST
मुंबईतील ऐतिहासिक इमारतींना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा title=

मुंबई : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक इमारतींना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळाला आहे. दक्षिण मुंबईतील परिसरातील व्हिक्टोरियन गॉथिक पद्धतीच्या कलात्मक म्हणजेच आर्ट डेको वास्तूंचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाला आहे. उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र पोलीस मुख्यालयसह इतरही देखण्या वास्तूंना नामांकन मिळालं आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या बहारिनमधील मनामा येथे झालेल्या 42 व्या परिषदेत याबाबत घोषणा करण्यात आली आहे. यामुळे राज्यात पाचव्या जागतिक वारसा स्थळाचा समावेश होणार असून देशातील सर्वात जास्त वारसा स्थळांचा मान असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे. 

यापूर्वी अजंठा, एलिफंटा, वेरुळ व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाला आहे. नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर आणि वास्तुरचनाकार आभा नरिन लांबा यांनी मुंबईतील या परिसराचा समावेश जागतिक वारसास्थळांमध्ये व्हावा, यासाठी खंबीरपणे बाजू मांडली होती.