आईचं दूध विकणारे कोण? गद्दार कोण शोधण्यासाठी सेना आमदारांना तातडीने 'वर्षा'वर बोलवलं

शिवसेना आमदारांची तातडीची बैठक आज मुंबईत होत आहे. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं कमी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत सर्व आमदारांना मुंबईत तत्काळ येण्याचे आदेश जारी केलेत

Updated: Jun 21, 2022, 07:43 AM IST
आईचं दूध विकणारे कोण? गद्दार कोण शोधण्यासाठी सेना आमदारांना तातडीने 'वर्षा'वर बोलवलं title=

मुंबई : शिवसेना आमदारांची तातडीची बैठक आज मुंबईत होत आहे. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं कमी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत सर्व आमदारांना मुंबईत तत्काळ येण्याचे आदेश जारी केलेत. विधान परिषदेत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार काठावर पास झालेत. 

शिवसेनेचे तब्बल 3 आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांची 9 अशी एकूण 12 मतं फुटल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे संतापलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना आज मुंबईत वर्षा निवासस्थानी दुपारी 12 वाजता बैठकीसाठी बोलावलं आहे. आईचं दूध विकणारे कोण? ठाकरे सरकार तपासणार आहे. सत्तेतले गद्दार कोण, कोणत्या गद्दारांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार याची उत्सुकता आहे.
 
भाजपची पुन्हा विजयी पताका
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार पहिल्याच फेरीत विजयी झाले. सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांनी पहिल्याच फेरीत विजय मिळवला. त्यांच्या विजयानंतर अहिर आणि पाडवी यांच्या समर्थकांनी विधान भवन परिसरात एकच जल्लोष केला.