मुंबईत लसीकरणाचा वेग मंदावला; प्रत्येक लसीकरण केंद्र आज फक्त एवढाच आकडा गाठणार

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसींची कमतरता भासत आहे. 

Updated: May 14, 2021, 05:38 PM IST
मुंबईत लसीकरणाचा वेग मंदावला; प्रत्येक लसीकरण केंद्र आज फक्त एवढाच आकडा गाठणार title=

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसींची कमतरता भासत आहे. लसींचा पुरवठा कमी असल्यामुळे मुंबईच्या लसीकरण केंद्रावर आज फक्त 200 नागरिकांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. लसींचा तुटवडा भासत असल्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आज  लसींची कमतरता भासत असल्यामुळे फक्त दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. 

महत्त्वाचं म्हणजे दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांनी देखील प्रथम अपॉइंटमेंट घेवून लसीकरण केंद्रावर जाता येणार आहे. अपॉइंटमेंट शिवाय कोणालाही लस मिळणार नासल्याचं सांगण्यात आलं आहे. सांगायचं झालं तर मुंबईत  सध्या 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण केलं जात आहे. त्यामध्ये देखील ज्या नागरिकांचा दुसरा डोस बाकी आहे, अशा नागरिकांचं लसीकरण करण्यात येत आहे. 
 
45 वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस भारत सरकार देवू शकत नाही. दुसऱ्या डोससाठी 20 लाख डोस हवे आहेत, पण फक्त 10 लाख डोस शुल्लक असल्य़ामुळे  45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण केलं जात आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. शिवाय लसीकरणाची कमतरता भासत असल्यामुळे 18 ते 44 वयोगटातील व्यक्तीच्या लसीकरणासाठी तुर्त स्थगिती देण्यात आली आहे. 

'भारताला घ्यायला हवी दुसऱ्या देशांची मदत'
अमेरिकेचे शीर्ष आरोग्य तज्ज्ञ आणि व्हाइट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ एंथोनी फौसी यांनी सांगितलं की, 'भारतात लसीकरणाची प्रक्रिया जलद करण्याची गरज आहे. त्यासाठी भारताने इतर देशांची मदत घ्यायला हवी. भारताची लोकसंख्या फार मोठी आहे, त्यामुळे फार कमी लोकांना दोन डोस मिळाले आहेत. त्यामुळे भारताने लसीकरणाची प्रक्रिया जलद करण्यासाठी दुसऱ्या कंपन्यांसोबत मिळून तयारी करायला हवी. '