Kanpur Fraud News : उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये फसवणूकीचा (Kanpur Fraud) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वृद्ध व्यक्तींना तरुण बनवण्याचं स्वप्न दाखवत एका दाम्पत्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. जवळपास हजारभर लोकांकडून 35 कोटी रुपये उकळत हे बंटी-बबली फरार झाले. कानपूरमधल्या एक क्लिनिकने दिलेल्या जाहीरातीवरुन तरुण दिसण्यासाठी लोकांनी वाट्टेल तितकी पैसे देऊन उपचार करण्यासाठी रांगा लागल्या. कोणी 10, कोणी 60 हजार तर कोणी 2 लाख रुपये दिले. पण ज्यावेळी आपली फसवणूक झाल्याचं त्यांना कळलं तेव्हा या लोकांनी पोलीस स्थानक गाठलं
तरुण बनवणारी टाईम मशीन
राजीव दुबे आणि रश्मी दुबे या दाम्पत्याने इस्त्रायली मशीद्वारे (Israeli Machine) वृद्धांना तरुण बनवलं जाईल अशी जाहीरात करत एक क्लिनीक उघडलं. या मशीनची जोरदार जाहीरात करण्यात आली. या मशीनद्वारे 65 वर्षांचा वृद्धही 25 वर्षांच्या तरुणासारखा दिसेल असं आमीष लोकांना दाखवण्यात आलं.
वृद्धांची कोट्यवधीची फसवणूक
इस्त्रायली मशीनद्वारे ऑक्सीजन थेरपी करत वृद्ध तरुणासारखे दिसायला लागतील या जाळ्यात सामान्य माणसंच नाही तर उच्चशिक्षित लोकंही अडकली, फसवणुक होणाऱ्या लोकांमध्ये एका महिला डॉक्टरचाही समावेश होता. पैसे दिल्यानंतर काही लोकांना या इस्त्रायली मशीनमध्ये बसवण्यात आलं. पण वयात कोणताच फरक पडला नाही. त्यानंतर महिला डॉक्टरच्या तक्रारीवरुन फसवणूकीचा नवा प्रकार समोर आला. यानंतर अनेक पीडित बंटी-बबलीविरोधात बोलण्यासाठी पुढे आले.
एका महिलेने सांगितलं 'टाईम मशीनद्वारे तुमच्या पेशी अॅक्टिव्ह केल्या जातील, त्यामुळे तुमचं वाढतं वय थांबेल आणि तुम्ही तरुणासारखं दिसायला लागाल, असं सांगण्यात आलं. यासाठी या दाम्पत्याने महिलेकडून 2 लाख रुपये घेतले. काही लोकांना या मशीनमध्ये बसवण्यात आलं, पण त्यांच्या वयात कोणताही फरक झाला नाही. ती मशीन इस्त्रायलवरुन मागवली नव्हती तर भारतातच तयार करण्यात आली होती, अशी पोलखोलही एका महिलेने केली.
सुरुवातीला 6 हजारांचा पॅकेज
लोकांची फसवणूक करण्यासाटी या आरोपी दाम्पत्याने सुरुवातीला केवळ 6 हजार रुपयांचं पॅकेज असल्याचं सांगितलं. पण यानंतर पैसे वाढतील असंही सांगितलं. थेरपीची किंमत केवळ 90000 हजार रुपये आहे असंही त्यांच्याकडून लोकांना सांगितलं.
हातची संधी जाऊ नये यासाठी अनेक लोकांनी अॅडव्हान बुकिंग सुरु केलं. सुरुवातीला लोकांना हायपरबेरिक ऑक्सिजन थेरेपी आणि हायड्रो थेरपी दिली जाणार असल्याचं सांगितलं. यासाठी लोकांना वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या. पण लोकं उपचार घ्यायला येण्याधीच बंटी-बबली सर्व गाशा गुंडाळून फरार झाले.