Mahalakshmi Murder Case : कर्नाटकातल्या (Karnataka) बंगळुरुमध्ये झालेल्या महालक्ष्मी हत्या प्रकरणाने (Mahalakshmi Murder Case) संपूर्ण देश हादरला. महालक्ष्मी नावाच्या एका महिलेच्या मृतदेहाचे 57 तुकडे सापडले होते. याप्रकरणी मुख्य आरोपी मुक्तीरंजन रॉय असल्याचं समोर आलं. पण अटक करण्याआधीच आरोपीने आत्महत्या केली. आरोपीने आत्महत्या केल्याने आरोपीने मुक्तीने महालक्ष्मीची हत्या का केली याचा तपास लागत नव्हता. याप्रकरणी पोलिसांनी सखोर तपास करत संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे.
पोलिासांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास करत हत्येमागच्या कारणांचा शोध लावला आहे. जवळपास आठ महिन्यांपूर्वी महालक्ष्मीचं आपल्या पतीबरोबर भांडण झालं आणि ती नेलमंगला सोडून बंगळुरुत राहायला आली. इथे तीने एका कंपनीत नोकरी सुर केली. त्याच कंपनीत फ्लोअर मॅनेजर पदावर काम करणाऱ्या मुक्तीरंजन रॉयशी तिची ओळख झाली.
मैत्री प्रेमात बदलली
कंपनीत एकत्र काम करताना महालक्ष्मी आणि मुक्तीरंजन यांची चांगली मैत्री झाली. मुक्तीरंजन कधी-कधी महालक्ष्मीला सोडायला तिच्या घरी जाऊ लागला. हळूहळू दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. पण महालक्ष्मीने आपलं पहिलं लग्न झालं असून एक मुलगा अकल्याचं मुक्तीला सांगितलं नव्हतं. मुक्तीने महालक्ष्मीसोर लग्नाचा प्रस्ताव ठेवल्यावर महालक्ष्मीनेही तो स्विकारला. मुक्तीरंजनला दोन भाऊ आहेत. एक भाऊ मु्क्तीबरोबर रहात होता. तर दुसरा भाऊ ओडिशातल्या गंजम इथं शिक्षण घेतो. मुक्तीने महालक्ष्मीबरोबरच्या लग्नाची माहिती आपल्या आई-वडिलांनी दिली. मुक्तीचं कुटुंबानेही लग्नाला संमती दिली.
महालक्ष्मीच्या वागणुकीवर संशय
पण काही दिवसांनी मुक्तीरंजनला महालक्ष्मीच्या वागणुकीवर संशय येऊ लागला. महालक्ष्मीचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध असल्याचा संशय मुक्तीला आला, यातूनच त्याने महालक्ष्मीचा मोबाईल फोन तपासल्या. तेव्हा त्याला महालक्ष्मीचं आधीच लग्न झालं असून तिला एक मुलगा असल्याचंही त्याला कळलं. यानंतर मुक्तीने महालक्ष्मीबरोबरचे संबंध तोडून टाकले. याचदरम्यान मुक्तीरंजनची कंपनीतल्या एका मुलीशी मैत्री झाली. याची माहिती मिळाल्यावर महालक्ष्मीने त्या मुलीसोबत भांडण केलं आणि पुन्हा मुक्तीबरोबर पुन्हा बोलायचं नाही अशी धमकी दिली. ही गोष्ट कळल्यावर मुक्ती आणि महालक्ष्मीमध्ये भांडण झालं.
महालक्ष्मीकडून मुक्तीला धमकी
पहिलं लग्न झाल्याचं लपवून ठेवल्याने आपण तुझ्याशी लग्न करु शकत नसल्याचं मुक्तीने महालक्ष्मीला सांगितलं. यावर महालक्ष्मीने पहिल्या पतीला घटस्फोट देणार असल्याचं सांगितलं. पण मुक्तीरंजनने लग्नास साफ नकार दिला. यावर संतापलेल्या महालक्ष्मीने मुक्तीला धमकी देण्यास सुरुवात केली. लग्न केलं नाहीस तर तुझ्याविरोधात पोलिसात तक्रार करु असं महालक्ष्मीकडून वारंवार धमक्या दिल्या जाऊ लागल्या. महालक्ष्मीच्या धमक्यांनी मुक्ती वैतागला होता. त्यामुळे तो कंपनीतून एक आठवड्याची सुट्टी घेत आपल्या घरी हेबाबगोडी इथं गेला. पण महालक्ष्मी त्याचा पाठलाग करत त्याच्या घरापर्यंत पोहोचली.
तिकडे गेल्यावर महालक्ष्मीने मुक्तीला भेटण्याची आग्रह केला. पण त्याच्या घरच्यांनी तिला भेटू दिलं नाही. महालक्ष्मी तिथून जात नसल्याने अखेर मुक्ती महालक्ष्मीला भेटायला तयार झाला. दोघांनी भांडणं मिटवण्याचं ठरवलं.
महालक्ष्मीची केली हत्या
त्यानंतर महालक्ष्मी आणि मुक्तीरंजन पुन्हा बंगळुरुला आले आणि महालक्ष्मीच्या फ्लॅटवर राहिले. पण त्या रात्री दोघांमध्ये पुन्हा भांडण झालं. भांडणादरम्यान महालक्ष्मीने आरोपी मु्क्तीला माराहम केली. यामुळे संतप्त झालेल्या मुक्तीने महालक्ष्मीच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसा मारला. यात महालक्ष्मी जागीच बेशूद्ध झाली. त्यानंतर मुक्तीने महालक्ष्मीच्या चेहरा उशीने दाबत तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाचं काय करायचं या विचाराने मुक्तीरंजन घाबरला. त्यानंतर त्याने इंटरनेटवर एक व्हिडिओ बघितला. ज्यात मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे दाखवण्यात आलं होतं. त्यानुसार मुक्तीने बाजारातून एक सुरा खरेदी केली आणि घरात येऊन त्याने महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तब्बल 57 तुकडे केले. ते तुकडे त्याने फ्रिजमध्ये ठेवले. तर एसिडने बाथरुममधले रक्ताचे डाग धुवून टाकले.
हत्येनंतर मुक्ती कुठे गेला?
महालक्ष्मीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर मुक्ती पुन्हा हेब्बागोडी इथे आपल्या घरी परतला. त्यानंतर त्याने लपण्यासाठी बांगलादेशला जाण्याचा निर्णय घेतला. बाईकवरुन तो 1660 किलोमीटर दूर असलेल्या भद्रक इथं पोहोचला. यादरम्यान त्याने आपल्या आई-वडिलांना महालक्ष्मीची हत्या केल्याचं सांगितलं. आईने त्याला गंजम इथे जाऊन राहण्यास सांगितलं. तिथे गेल्यावर दररोज तो मोबाईलवर बातम्या लाईव्ह बघत होता. अखेर एक दिवस महालक्ष्मीच्या हत्येची बातमी समोर आली. पोलिसांनी आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये छापेमारी सुरु केल्याचं पाहिल्यानंतर तो घाबरला. अटक होईल या भीतीने त्याने भद्रक इथल्या एक स्मशानभूमीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केली.