सूर्यावर भयानक विस्फोट! पृथ्वी ब्लॅकआउट होणार? फोटो पाहून NASA चे संशोधक टेन्शनमध्ये

ऑगस्ट 2022 मध्ये अशाच प्रकारची सौर वादळे आली होती. सूर्यावर 35 भयानक स्फोट झाले आहेत. तर तब्बल सहा वेळा सौर लहरींचा कहर पहायला मिळाला आहे. 2025 वर्ष हे अत्यंत धोकादायक असेल अशी भिती देखील व्यक्त केली जात आहे.

वनिता कांबळे | Updated: Oct 5, 2024, 06:11 PM IST
सूर्यावर भयानक विस्फोट! पृथ्वी ब्लॅकआउट होणार? फोटो पाहून NASA चे संशोधक टेन्शनमध्ये title=

Solar Superstorm Threat :  सुर्य हा पृथ्वीला ऊर्जा देणारा स्त्रोत आहे.  सूर्यामुळेच पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता मिळते. यामुळेच पृथ्वीतलावर सजीवाचे अस्तित्व कायम आहे. सूर्यावर घडणाऱ्या घडामोडींचा थेट परिणाम पृथ्वीवर होतो. सूर्यावर सध्या एका भायनक सौर वादळाचा विस्फोट झाला आहे. NASA च्या Solar Dynamics Observatory (SDO) ने सूर्यावर आलेल्या या वादळाचे फोटो कॅप्चर केले आहेत. हे फोटो पाहून NASA चे संशोधक टेन्शनमध्ये आले आहेत. कारण या सौर वादळामुळे पृथ्वीवर रेडिओ ब्लॅकआउटचा धोका निर्माण होऊ शकतो अशी भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे. 

हे देखील वाचा... पृथ्वीला हादरवणारा जगातील सर्वात शक्तीशाली प्रकल्प; याची पावर पाहून NASA चे संशोधकही घाबरले

 

NASA च्या Solar Dynamics Observatory (SDO) ने सूर्याच्या पृष्ठभागावर X9-श्रेणीचा सौरज्वाळा कॅप्चर केल्या आहेत. 2017 नंतर आलेला हा सर्वात शक्तिशाली सौर भडका असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.  या सोलर फ्लेअरचे फोटो नासाने प्रसिद्ध केले आहे. या छायाचित्रांमध्ये सूर्य  आगीच्या मोठ्या गोळ्या प्रमाणे दिसत आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर पृथ्वीच्या दिशेने एक तीव्र स्फोट होताना देखील या छायाचित्रात दिसत  आहे.

सोलर डायनॅमिक्स वेधशाळा म्हणजे काय?

2010 मध्ये NASA ने  सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्व्हेटरी मिशन लाँच केले होते. सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राच्या ऊर्जेशी संबंधित संशोधन करुन माहिती गोळा करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.  नासाचे हे अंतराळयान सूर्याचा अभ्यास करते.  सूर्याच्या बाह्य भागावरील हालचाली Solar Dynamics Observatory टिपल्या जातात. Solar Dynamics Observatory ही छायाचित्रे नासाला पाठवते. मनुष्या उघड्या डोळ्यांनी काही सेकंद देखील सूर्याकडे पाहू शकत नाही. मात्र,  नासाचे Solar Dynamics Observatory स्पेसक्राफ्ट 24 तास सूर्याचे निरीक्षण करते. 

पृथ्वीसाठी धोक्याचा इशारा

आता निर्माण झालेले हे सौरवादळ पृथ्वीसाठी धोक्याचा इशारा ठरणार आहे. या वादळाचा सजीवावर थेट परिणाम होणार नसली तरी रेडिओ सिग्नल्सवर याचा  परिणाम होणार आहे. या सौर वादळामुळे सिंग्नल यंत्रणेत व्यत्यय येवू शकतो. GPS नेव्हिगेशन, मोबाईल फोन सिग्नल आणि सॅटेलाइट टीव्हीमध्ये अडचण येवू शकते. पॉवर लाईनमधील करंट जास्त असू शकतो, ज्यामुळे ट्रान्सफॉर्मर देखील उडू शकतो.  पॉवर ग्रीडवर या परिणाम होऊन ब्लॅकआऊट होऊ शकतो. 
1755 पासून या सौर वादळांची नोद केली जात आहे. तेव्हापासून आा पर्यंत 25 वेळा अशा प्रकारच्या सौर वादळांचा अभ्यास करण्यात आला आहे. मात्र, दिवसेंदिवस हे सौरवादळ अधिक वेगवान झाले आहे. अंदाजापेक्षा जास्त सनस्पॉट्स आणि उद्रेक होताना दिसत आहेत.