रेल्वेचा मोठा निर्णय! दौंड-हडपसर डेमू आता पुणे स्टेशनपर्यंत धावणार, हजारो प्रवाशांना दिलासा

दौंड रेल्वे स्टेशनचा समावेश पुणे रेल्वे विभागात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 5, 2024, 07:29 PM IST
 रेल्वेचा मोठा निर्णय! दौंड-हडपसर डेमू आता पुणे स्टेशनपर्यंत धावणार, हजारो प्रवाशांना दिलासा title=

Daund Hadapsar Demu Train : दौंड-हडपसर डेमू ट्रेनने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. दौंड ते हडपसरपर्यंत धावणारी डेमू ट्रेन आता पुण्यापर्यंत धावणार आहे. डेमू ट्रेन हडपसर ऐवजी पुणे स्टेशनपर्यंत नेण्यात यावी अशी मागणी  प्रवाशांनी केली होती. अखेर रेल्वेने प्रवाशांची ही मागणी मान्य केली आहे. 

हे देखील वाचा...मुंबई ते पुणे 20 मिनिटांत, मुंबई ते गोवा एका तासात आणि मुंबई ते नागपूर फक्त दीड तासात... विमानापेक्षा सुपरफास्ट ट्रेन

 

दौंड स्थानकावरून सकाळी 6:10 वाजता सुटणारी 01522  डिझेल (DMU LOCAL) रेल्वे पुण्यापर्यंत धावणार आहे.  ही डेमू ट्रेन हडपसर (मुंढवा) पर्यंतच असल्याने हजारो विद्यार्थी, चाकरमानी, कर्मचारी व महिलांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत होते. यामुळे ही डेमू हडपसर ऐवजी पुणे स्टेशन पर्यंत नेण्यात यावी अशी प्रवाशांची मागणी होती. आता 01522  ही डेमू रेल्वे  दौंड स्टेशन वरून सकाळी  6:05 वाजता सुटेल. 

हे देखील वाचा... भारतातील पहिली 4 लेअर वाहतूक व्यवस्था आपल्या महाराष्ट्रात; महामार्गावर रेल्वे ब्रीज, ब्रीजवर फ्लायओव्हर त्यावर धावते मेट्रो

याबाबत  रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव  यांचेकडे दिल्ली येथे भेट घेऊन तसेच तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे यांनी दौंड रेल्वे स्टेशन येथे भेट दिली त्यावेळी केली होती, तसेच आपण याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. 01522   - दौंड - हडपसर डेमू पुण्यापर्यंत नेण्याची मागणी केली होती. 

या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव यांचेकडे दिल्ली येथे भेट घेऊन तसेच तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे यांचे दौंड पुणे रेल्वे प्रवासी संघाच्यावतीने तसेच प्रवाशांच्यावतीने आभार मानण्यात आले.  तसेच दौंड रेल्वे स्टेशनचा समावेश पुणे रेल्वे विभागात करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल देखील  रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव, तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे यांचे प्रवाशांनी आभार मानले.