मुंबई : राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावरुन महाविकासआघाडी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. ओबीसींची फसवणूक करण्साचे काम सरकार करतंय असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
'काही अधिकारी अपरिपक्व आहे. असं पत्र राज्यपालांना पाठवण्याआधी खातरजमा सीएम यांनी करायला हवी. राज्यपालांना काही निवेदन मिळाले. त्यावर पत्र पाठवले होते. राज्यपाल यांनी ते फार्वड केले, आदेश दिले नाही, त्यांचा अधिकार आहे. याला राजकीय रंग देणे चुकीचं आहे.'
'ओबीसी राजकीय आरक्षण प्रस्ताव विधी न्याय विभागान म्हटले की, अध्यादेश काढण्याच्या आधी कोर्टाच ओपिनियन घेणे गरजेचे होतं. पण तसं केले नाही. त्यामुळे ओबीसींची फसवणूक करण्साचे काम सध्या सरकार करतंय. महाधिवक्ता यांचे ओपिनियन घेणे गरजेचे होते. पण घेतले गेले नाही, कॅबिनेट नंतर थेट राज्यपाल याच्याकडे अध्यादेश पाठवला गेला त्यामुळे त्रूटी निघाल्या.'
राज्यसभा बिनविरोध संदर्भात पवार साहेब समवेत चर्चा झालेली नाही. आमच्या पक्षात कोअर कमिटी चर्चा करेन. तुर्तास आम्ही निवडणूक लढवणार आहोत. असही फडवणीस यांनी म्हटलं आहे. प्रभाग रचना यावरून महाविकास आघाडीत मतभेद आहेत ते नेमके काय स्पष्ट व्हावे मग बोलू. असंही फडवणीस म्हणाले.