प्रशांत अंकुशराव झी मीडिया मुंबई: आतापर्यंत तुम्ही स्पायडर मॅन हे कार्टून पाहिलं असेल किंवा एखाद्याला उपमा देताना ऐकली असेल. पण स्पायडर मॅन चोर ऐकलं आहे का? मुंबईतून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी एका स्पायडरमॅनला अटक केली आहे. मात्र हा स्पायडरमॅन चोर आहे.
स्पायडरमॅन स्टाईलने चोरी करून तो पळत असताना मुंबई पोलिसांनी आपल्या टेकनिकने त्याला पकडलं. दक्षिण मुंबईतील कडावाला सफायर इमारत आहे. या इमारतीवर चढून कुणी चोरी करेल असं या रहिवाशांना कधीही वाटलं नव्हतं. मात्र स्पायडरमॅन चोरानं इथल्या रहिवाशांना गंडा घातला.
सिनेमा किंवा कार्टुन अथवा सीरियलमध्ये लोकांच्या मदतीला स्पायडरमॅन धावून जातो. मात्र या स्पायडरमॅननं भिंतीवरून सरसर चढत थेट दहाव्या मजल्यावरील राहुल बोहरा यांच्या फ्लॅटमध्ये शिताफीनं घुसखोरी केली. आणि तब्बल बारा लाखांचा ऐवज लंपास केला.
राहुल बोहरा सहकुटुंब गावाला गेलं होते. गावावरून परत आल्यावर त्यांना चोरीची घटना लक्षात आली. पोलिसांनी पाहणी केली असता फ्लॅटचे दरवाजे व्यवस्थित होते. त्यामुळे दहाव्या मजल्यावर चोर कसा आला असा प्रश्न पोलिसांना पडला.
मुंबईतील या इमारतीवर सीसीटीव्ही होते. या चालाख स्पायडरमॅन चोरानं सीसीटीव्हीलाही चकवा दिला होता. बोहरा यांच्या घरी पीओपीचं काम सुरू होतं. त्यामुळे पोलिसांची नजर हे काम करणा-या मुख्तार अली उर्फ मौसमवर पडली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. हा स्पाय़डरमॅन बनलेला मुख्तारचा मौसमचं बदलला. या स्पायडरमॅननं केवळ बोहरांनाच गंडा घातलाय की आणखी काही इमारतींच्या भिंती चढलाय याचा पोलीस तापस करत आहेत.