लोकलने प्रवास करणाऱ्यांचा त्रास कमी होणार; पाहा ही महत्तपूर्ण बातमी

Mahaparinirvan Din 2022 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र व इतर राज्यातील लाखो अनुयायीसाठी रेल्वेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. 

Updated: Dec 6, 2022, 10:47 AM IST
लोकलने प्रवास करणाऱ्यांचा त्रास कमी होणार; पाहा ही महत्तपूर्ण बातमी title=
special facilities of railway on Mahaparinirvan Din 2022

BR Ambedkar Death Anniversary : 6 डिसेंबर हा दिवस म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा स्मृतिदिन. भारतातील पददलितांसाठी या दिवसाची पहाट सूर्योदयानं नव्हे, तर सूर्यास्तानं झाली. कारण या दिवशी शोषित-वंचितांचा आधार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झालं. याचपार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din 2022) दादर येथील चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र व इतर राज्यातील लाखो अनुयायी मोठ्या संख्येने रेल्वेने येतात. या आंबेडकर अनुयायांची रेल्वे (railway station) स्थानकात गैरसोय होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वेकडून ( Western Railway Mumbai ) जोरदार तयारी करण्यात आली आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar)  यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायीसाठी दादर रेल्वे स्थानकात (dadar railway station) मदत कक्ष उभारण्यात आलेल्या आहे. तसेच दादर स्थानकात चैत्य भूमि आणि राजगृह स्मारक दिशादर्शक फलक मराठी, हिंदी , इंग्रजी भाषेत असणार आहे. दादर स्थानकांबाहेर आगमन , बाहेर पडण्याची ठिकाणे यासह इतर बाबींबाबत सूचना फलक लावण्यात आले आहे. नागरिकांना स्थानकांवर ये-जा करण्यासाठी योग्य उपाययोजना आणि नकाशा तयार करण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वे स्थानकावर आरपीएफ (RPF) आणि जीआरपीचे (GRP) 450 कर्मचारी तैनात असणार आहे. नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी मेगाफोन द्वारे घोषणा आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना कारण्यासाठी रेल्वे निरीक्षकांची टीम उपलब्ध असणार आहे.

वाचा: गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर  

तिकीट सुविधा 

- दादर स्थानकात अतिरिक्त तिकीट काउंटर असणार आहेत.

-  एटीव्हीएमवर (ATM) अतिरिक्त फॅसिलिटेटर अतिरिक्त तिकीट काउंटर कर्मचारी ,तिकीट तपासनीस असणार आहे. जेणेकरून तिकीट खिडक्यावर प्रवाशांची गर्दी होणार नाहीत.

- प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे स्थानकात पिण्याचे पाणी आणि सूचना फलक तसेच खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

- कॅटरिंग युनिटला सकाळी लवकर खोलण्याचे आणि रात्री शेवटच्या गाडी पर्यंत चालू ठेवण्याच्या सूचना

- दादर स्थानकात अतिरिक्त शौचालय व्यवस्था

- फलाट क्रमांक 5 च्या वाहन बाजूला पार्किंग सुविधा

- लिफ्ट और एस्केलेटर चालविण्यासाठी कर्मचारी तैनात

वैद्यकीय मदत कक्ष

- दादर स्थानकात 24 तास आपत्कालीन किट सह डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध

- पोर्टेबल मेडिकल किट सह वांद्रे रुग्णवाहिका 7 डिसेंबर पर्यंत उपलब्ध

- प्लॅटफॉर्म 6 वर ईएमआर सुविधा

- स्थानकांवर अधीक्षक / स्टेशन मास्तर जवळ वैद्यकीय टीमची माहिती उपलब्ध