Mahaparinirvan Diwas 2022 : यशस्वी व्हायचं असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडर यांचे हे विचार आचरणात आणा!

ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन...!

Updated: Dec 6, 2022, 01:55 AM IST
Mahaparinirvan Diwas 2022 : यशस्वी व्हायचं असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडर यांचे हे विचार आचरणात आणा!

Mahaparinirvan Diwas 2022 :  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्तानं बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर अनुयायांचा मोठा जनसागर उसळला आहे. बाबासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी राज्यभरात 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din) म्हणून साजरा केला जातो. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीत त्यांचे निधन झाले. मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. येथेच बाबासाहेबांची समाधी बांधण्यात आली. दरवर्षी देशभरातूल लाखो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल होतात.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, स्त्रिया, मजूर यांना असमानतेच्या दरीतून बाहेर काढून त्यांच्या जगण्याला समानतेच्या माध्यमातून नवी दिशा दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तरुणांसाठी दिशा दर्शक आहेत. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडर यांचे हे विचार नक्कीच आचरणात आणले पाहिजेत.

"स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवणाऱ्या धर्मावर माझा विश्वास आहे."
"ज्या राष्ट्राला आपला इतिहास माहित नाही, ते राष्ट्र कधीच इतिहास घडवू शकत नाही."
"शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि उत्साही व्हा."
"माणूस नश्वर आहे, तसे विचार आहेत. एखाद्या कल्पनेच्या प्रसाराची गरज असते जसे वनस्पतीला पाण्याची आवश्यकता असते, अन्यथा ते कोमेजून मरतात."
"महान माणूस हा प्रतिष्ठित माणसापेक्षा वेगळा असतो कारण तो समाजाचा सेवक होण्यास तयार असतो."
"बुद्धीमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे."