शिवसेना-भाजपात सापाचं वैर, मुख्यमंत्र्यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा भाजप-शिवसेना आमनेसामने आले आहेत.  

Updated: Mar 3, 2022, 09:26 PM IST
शिवसेना-भाजपात सापाचं वैर, मुख्यमंत्र्यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल  title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : शिवसेना-भाजप यांच्यातील वाद या ना त्या विषयावरुन सुरुच असतो. आता या वादातील नव्या अंकाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा भाजप-शिवसेना आमनेसामने आले आहेत. ज्या सापाला तीस वर्षं दूध पाजलं, तो आता वळवळतोय, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि नंतर त्यावरुन चांगलाच संघर्ष सुरू झाला. काय आहे हे शिवसेना आणि भाजपमधलं सापाचं वैर, हे आपण जाणून घेऊयात.  (shivsena party uddhav thackeray and bhartiya janta party devendra fadnvis alligation on each other over to alliance issue)
 
हे दृश्यं पाहून आता बराच काळ लोटला. एकेकाळी जे एकमेकांना मोठा भाऊ, छोटा भाऊ म्हणायचे तेच आता एकमेकांना साप म्हणू लागलेत. आम्ही ३० वर्षे सापाच्या पिल्लाला दूध पाजलं, ते आता वळवळतंय' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच मुख्यमंत्र्यांनी भाजपविरोधातली शस्त्रं परजली. 

सापाच्या पिल्लाला आम्ही ३० वर्षे दूध पाजले, आता ते वळवळ करतंय, आता हे छापे बंद करा, खपवून घेणार नाही. तुमच्यात हिम्मत असेल तर दाऊदला पकडून दाखवा, छापे कसले टाकता. माझं तुम्हाला आव्हान आहे की माझे १७० मोहरे तुमच्या गोटात घेऊन दाखवा आणि सरकार पाडून दाखवा, असं थेट आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिलं.

मुख्यमंत्र्यांनी सापाचं पिल्लू म्हणत केलेल्या टीकेचं विष भाजपलाही झोंबलं. शिवसेना-भाजप युती बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. बाळासाहेब ठाकरेंनी पण सापाशी युती केली होती का, असा सवाल फणडवीसांनी विचारला

मलिकांवरच्या ईडी धाडी आणि अटक, यशवंत जाधवांच्या घरी इन्कम टॅक्सचे छापे, सरकार पाडण्याची भाजपची तारीख पे तारीख आणि त्यातच सुप्रीम कोर्टानं फेटाळलेला ओबीसी आरक्षणाचा अहवाल. या सर्व पार्श्वभूमीवर सापाच्या टीकेवरुन सुरू झालेला संघर्ष अधिवेशनात आणखी विखारी होणार आहे.