Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नक्की कारण काय?

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला निघाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) अनेक चर्चांना उधाण आलंय.   

Updated: Dec 3, 2022, 08:43 PM IST
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नक्की कारण काय? title=

मुंबई : राजकीय वर्तुळातून (Maharashtra Politics) मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Shiv Sena Ubt) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) माजी मुख्यमंत्र्यांच्या ( Former Chief Minister) भेटीला निघाले आहेत. उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीबाबत अनेक चर्चांना उधाण आलंय. (shiv sena ubt uddhav thackeray meets former cm and senior leader manohar joshi at mumbai maharashtra politics)

मनोहर जोशी यांचा शुक्रवारी 2 डिसेंबरला वाढदिवस होता. जोशी यांनी वाढदिवसानिमित्त मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. मी आधीपासूनच सेनेत आहे, अंस जोशी म्हणाले होते.  जोशी यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता ठाकरे भेटीला गेले आहेत.

भेटीचं कारण काय? 

उद्धव ठाकरे हे जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणयासाठी भेटीला निघालेत. तसेच त्यांच्या तब्येतीची चौकशी करणार आहेत. मात्र या भेटीत विविध राजकीय चर्चा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. आगामी महापालिकेच्या दृष्टीने ही भेट अतिशय महत्त्वाची समजली जात आहे.

डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न?

एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. अनेक दिग्ग्जांनी ठाकरेंची साथ सोडली. अवघ्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार गजानन कीर्तीकरांनीही शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न असल्याची चर्चा यानिमित्तानं रंगतेय.