संजय राठोडांना दणका; संत सेवालाल महाराजांच्या पाचव्या वंशजानी ठाकरेंची ताकद वाढवली

बंजारा धर्माचे संत सेवालाल महाराज (पोहरादेवी) यांचे पाचवे वंशज आणि माजी आमदार स्व. गजाधर राठोड यांचे चिरंजीव अनिल गजाधर राठोड यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे.  शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्यानंतर बंजारा समाजात संघटन वाढवण्यासाठी आणखी एका बंजारा समाजाच्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Updated: Dec 3, 2022, 07:37 PM IST
संजय राठोडांना दणका; संत सेवालाल महाराजांच्या पाचव्या वंशजानी ठाकरेंची ताकद वाढवली title=

मेघा कुचीक, झी मीडिया, मुंबई :  शिंदे गटातील मंत्री आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड(Sanjay Rathore) यांना ठाकरे गटाने जबरदस्त झटका दिला आहे. संत सेवालाल महाराज(Sant Sewalal Maharaj ) यांचे पाचवे वंशज अनिल राठोड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सामील झाले आहेत. मातोश्री निवासस्थानी  अनिल राठोड यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अनिल राठोड यांच्या हातावर शिवबंधन बांधले. राठोड यांच्या पक्ष प्रवेशामुळे ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे. 

बंजारा धर्माचे संत सेवालाल महाराज (पोहरादेवी) यांचे पाचवे वंशज आणि माजी आमदार स्व. गजाधर राठोड यांचे चिरंजीव अनिल गजाधर राठोड यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे.  शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्यानंतर बंजारा समाजात संघटन वाढवण्यासाठी आणखी एका बंजारा समाजाच्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

नेहमी पाठीशी उभा राहणारा बंजारा समाज संजय राठोडांची साथ सोडणार आहे. यापूर्वी  बंजारा समाजाचे महंत  सुनील महाराज यांनी ठाकरेंना आपला पाठिंबा दर्शवला आहे. मंत्रीपद गेल्यानंतरही बंजारा(Banjara Poharadevi ) समाजाचे महंत संजय राठोड यांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहिले होते.  मंहतांपोठापाठ आता  संत सेवालाल महाराजांचे पाचव्या वंशजांचा ठाकरे गटातील संजय राठोड यांना मोठा धक्का मानला जात आहे.