कंगनाच्या उद्गारांशी असहमत, खासदाराने अशी प्रतिक्रिया देणे योग्य नाही - उच्च न्यायालय

कंगनाच्या उद्गारांशी आम्ही असहमत आहोत, पण एका खासदाराने अशी प्रतिक्रिया द्यावी हे शोभते का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने  संजय राऊत यांना विचारला. 

Updated: Sep 30, 2020, 08:11 AM IST
कंगनाच्या उद्गारांशी असहमत, खासदाराने अशी प्रतिक्रिया देणे योग्य नाही - उच्च न्यायालय title=
संग्रहित छाया

मुंबई : कंगनाच्या उद्गारांशी आम्ही असहमत आहोत, पण एका खासदाराने अशी प्रतिक्रिया द्यावी हे शोभते का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारला. कंगना रानौतने केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान राऊत यांच्या वकिलांनी त्यांची बाजू काल मांडली. 

आम्हीही महाराष्ट्रीय आहोत, आम्हालाही राज्याचा अभिमान आहे पण आम्ही कोणाचं घर तोडायला जात नाही, असे न्यायालयाने राऊत यांना सुनावले. अशी प्रतिक्रिया योग्य आहे का, असा सवाल न्यायालयाने केला. कायदा काय आहे, उखाड देंगे म्हणजे काय, असा सवाल न्यायालयाने केला. तुम्ही खासदार आहात. तुम्ही कायद्याचा सन्मान राखू शकत नाही का? तुम्ही विचारता कायदा काय आहे, अशा शब्दात न्यायालयाने राऊत यांना खडसावले. 

दरम्यान, कंगनाविरुद्ध घेतलेली भूमिका ही महाराष्ट्राच्या हिताची भूमिका होती, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणाऱ्यांचे दात घशात जातील, असंही राऊत म्हणाले. तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली भेट सामनाच्या मुलाखतीसाठीच होती, असे सांगतानाच लवकरच आपण काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भाजप नेते अमित शाह यांचीही मुलाखत घेणार आहोत, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

6\