शिंदे गटाच्या युवासेनेची कार्यकारिणी जाहीर, राज्य कार्यकारिणीत आमदारपुत्रांचाच भरणा

शिंदे गटातल्या 'या' आमदाराच्या मुलाचा पत्ता मात्र कापला, वाद असल्याची चर्चा 

Updated: Sep 30, 2022, 07:54 PM IST
शिंदे गटाच्या युवासेनेची कार्यकारिणी जाहीर, राज्य कार्यकारिणीत आमदारपुत्रांचाच भरणा title=

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या युवासेनेला (Yuvesena) शह देण्यासाठी शिंदे गटानेही (Shinde Group) आपल्या गटाच्या युवासेनेची कार्यकारिणी (Yuvasena Executive) जाहीर केली आहे. मात्र घराणेशाहीचे आरोप करणाऱ्या शिंदे गटाच्या युवासेनेच्या कार्यकारिणीत नेत्यांच्याच मुलांचा मोठ्या प्रमाणात भरणा दिसून येतोय. शिंदे गटातील आमदार पुत्रांच्या खांद्यावर युवा कार्यकारिणीची धुरा सोपवण्यात आलीय. दादा भुसे (Dada Bhuse), अर्जुन खोतकर (Arjun Khotkar), भरत गोगावले (Bharat Gogavale), सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्या मुलांचा युवासेना कार्यकारिणीत समावेश करण्यात आलाय. 

मात्र प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक (Purvesh Sarnaik) यांचा या कार्यकारिणीतून पत्ता कट झालाय. त्यामुळे शिंदे आणि सरनाईकांमध्ये वाद असल्याची चर्चा पुन्हा रंगू लागलीय.

शिंदे गट युवा सेना कार्यकारणी सदस्य 

उत्तर महाराष्ट्र :
अविष्कार भुसे

मराठवाडा :

अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे-पाटील 

कोकण : 
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 
विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे 

पश्चिम महाराष्ट्र :
किरण साली, सचिन बांगर 

कल्याण भिवंडी :
दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक 

ठाणे, नवी मुंबई व पालघर :
नितीन लांडगे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले, राहुल लोंढे 

मुंबई :
समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे 

विदर्भ :
ऋषी जाधव, विठ्ठल सरप पाटील

शिंदे -  सरनाईक वाद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यातला वाद पुन्हा चर्चेत आलाय. ओवळा-माजीवाडा मतदारसंघावरून दोघांमध्ये वितुष्ट आल्याची चर्चा होती. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनाही स्पष्टीकरण द्यावं लागलंय. दो दिल एक जान है हम असं ट्वीट सरनाईक यांचा मुलगा पूर्वेश सरनाईकांनी केलंय. तर आपल्यात कोणतेही वाद नाहीत असं मुख्यमंत्री म्हणालेत.