राज ठाकरेंशी गुफ्तगू केल्यानंतर पवार आज उद्धव ठाकरेंसोबत मंचावर

काही दिवसांपूर्वी प्रकट मुलाखतीच्या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती लावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्यासपीठावर असणार आहेत.

Updated: Mar 18, 2018, 11:37 AM IST
राज ठाकरेंशी गुफ्तगू केल्यानंतर पवार आज उद्धव ठाकरेंसोबत मंचावर  title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी प्रकट मुलाखतीच्या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती लावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्यासपीठावर असणार आहेत.

निमित्त आहे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते डॉ. मनोहर जोशी यांच्या पुस्तक प्रकाशनाचे... जोशींनी लिहलेल्या 'अवघे पाऊणशे वयमान' या पुस्तकाचे प्रकाशन आज सायंकाळी ५.०० वाजता होणार आहे. 

हा कार्यक्रम दादर येथील शिवाजी मंदिरमध्ये पार पडणार आहे. या कार्यक्रमाला देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.