'शरद पवार हे राज्यातील बर्मुडा ट्रँगल, त्यांच्यामुळेच Shivsena संपली'

शरद पवार यांच्यामुळेच शिवसेना संपली असा आरोप शिवसेनेच्या एका नेत्याने केला आहे.

Updated: Oct 9, 2022, 04:01 PM IST
'शरद पवार हे राज्यातील बर्मुडा ट्रँगल, त्यांच्यामुळेच Shivsena संपली' title=

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) अंधेरी पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण (Arrow and Bow) हे चिन्ह गोठवलं आहे. सोबतच निवडणुकीत शिवसेनेचं (Shiv sena) वापरण्यास देखील बंदी घातली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. शिंदे गटाकडून येथे उमेदवार दिला जाणार नसल्याने याचा फायदा भाजपला (BJP) होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

शिवसेनेचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. 'शिवसेना संपवण्यास शरद पवार जबाबदार आहेत अशी टीका विजय शिवतारे यांनी केलीये. शरद पवार यांनी शिवसेना संपवण्यासाठी 2014 पासून कट केला आणि आज तो सफल झालेा अशी टीका त्यांनी केलीये. लोकांना वापरायचं आणि सोडून द्यायचं हे पवार यांचं काम आहे. पवार हे बर्मुडा ट्रँगल आहेत अशी टीका त्यांनी केलीये.

'शरद पवारांच्या (Sharad Pawar) नादी लागून उद्धव ठाकरे यांनी 50 वर्ष जुनी ही संघटना त्यांच्या दावणीला बांधली. त्यावेळेस देखील मी सांगितलं होतं. त्यांनी यातून स्वत:चा फायदा करुन घेतला'. अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

'पक्षामागे कार्यकर्त्यांचं मोठं बळ असतं त्यामुळे अशा पद्धतीनं पक्ष संपवता येत नाही.' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे 6 वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.