दुबईहून 'तो' फोन येताच 'मातोश्री'ची सुरक्षा वाढवली

हालचालींना वेग... 

Updated: Sep 6, 2020, 05:10 PM IST
दुबईहून 'तो' फोन येताच 'मातोश्री'ची सुरक्षा वाढवली  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray यांच्या मुंबईतील 'मातोश्री' या  निवास्थानाची सुरक्षा एकाएकी वाढवण्यात आली आहे. शनिवारी रात्री ११ च्या सुमारास आलेल्या फोन कॉलनंतर इथं या हालचाली पाहायला मिळाल्या. हा फोन कॉल दुबईहून एका अज्ञान व्यक्तीनं केल्याचं म्हटलं जात आहे. सदर प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, खुद्द राज्याचे गृहमंत्री या प्रकरणात लक्ष देत आहेत. 

'मातोश्री'वर दाऊदच्या नावे आलेल्या या धमकीच्या फोनमुळं या ठिकाणी सुरक्षा तातडीनं वाढवण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठार मारू आणि 'मातोश्री' निवास्थान बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी या फोनवरुन देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. परिणामी यामध्ये दाऊद कनेक्शन जोडलं जात असून, ही धमकी त्याच्याकडून आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दुबईहून अज्ञात व्यक्तीने ४ फोन कॉल काल रात्री ११ च्या सुमारास मातोश्रीच्या लँडलाईनवर केले होते. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार फोन कॉल दुबईहून आले होते. फोन करणारी व्यक्ती दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देत होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवास्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारी व्यक्ती कोण आहे...? दुबईहून फोन काँल मातोश्रीवर लँडलाईनला फोन कॉल कोणी केले, याचा आता तपास आता राज्य गुप्तचर विभाग आणि सर्व सुरक्षा यंत्रणा करत आहेत. 

 

'मातोश्री'वर आलेल्या फोनवरील धमकीनंतर मातोश्री निवास्थानासोबतच ठाकरे कुटुंबाचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एकिकडे ठाकरे कुटुंबाच्या निवावस्थानी ही धमकी आलेली असतानाच दुसकीकडे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी आपण मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभं असल्याची प्रतिक्रिया दिली. सोबच या धमक्यांच्या फोनची केंद्राकडून चौकशी व्हावी अशी मागणीही केली.