....तरच माफीचा विचार- संजय राऊत

जर त्या मुलीनं ... 

Updated: Sep 6, 2020, 02:51 PM IST
....तरच माफीचा विचार- संजय राऊत  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : बॉलिवूडमधील ड्रग्ज माफियांबाबत गौप्यस्फोट करणाऱ्या अभिनेत्री kangana ranaut कंगना राणौत हिने थेट Mumbai मुंबई या शहरावरच निशाणा साधत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. ज्यानंतर कंगनाचा खुद्द  sanjay raut  संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. अनेक स्तरांतून तिचा मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. 

 'मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे...ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही,' असं ट्विट करत संजय राऊत यांनी कंगनाला थेट शब्दांत सुनावलं. ज्यानंतर आपल्याला होणाऱ्या विरोधाचं एकंदर स्वरुप पाहता बी- टाऊनच्या या क्वीननं नमतं घेतलं. 

कंगनानं आळवलेला नवा सूर पाहता आता तिला माफी मिळते का, हासुद्धा प्रश्नच. मुख्य म्हणजे संजय राऊत यांनी कंगनाला माफ करण्याबाबतही एक स्पष्ट अट ठेवली आहे. माध्यमांशी संवाद साधताना याबाबत राऊत म्हणाले, 'जर त्या मुलीनं (कंगनानं) महाराष्ट्राची माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार केला जाईल. तिनं मुंबईला मिनी पाकिस्तान म्हटलं, अहमदाबादविषयी असंच बरळण्याचं धाडस तिच्यात आहे का?' 

 

मुंबईसाठी आक्षेपार्ह वक्तव्य करणारी कंगना, गुजरात या पंतप्रधानांच्या राज्यातील अहमदाबादबाबत असं वेडवाकडं बोलण्याची हिंमत दाखवणार का, असा सवाल करत राऊत यांनी तिच्यावर तोफ डागली. तेव्हा आता कंगना यावर नेमकी काही प्रतिक्रिया देणार की, सबंध महाराष्ट्राचीच माफी मागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.