SBI च्या मुंबई शाखेत नोकरी आणि 85 लाखांपर्यंत पगार, 'येथे' पाठवा अर्ज

SBI Bank Job: स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेत सिनीअर वाइस प्रेसिडंटचे पद भरले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पीजीडीएम/ पीजीडीबीएस/ एमबीए किंवा त्या समकक्ष पदवी पूर्ण केलेली असावी.

Pravin Dabholkar | Updated: Aug 28, 2023, 09:47 AM IST
SBI च्या मुंबई शाखेत नोकरी आणि 85 लाखांपर्यंत पगार, 'येथे' पाठवा अर्ज title=

SBI Recruitment 2023: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या तसेच मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु केली असून एसबीआयच्या मुंबई शाखेत ही भरती केली जाणार आहे. यासाठी एसबीआयच्या वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेत सिनीअर वाइस प्रेसिडंटचे पद भरले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पीजीडीएम/ पीजीडीबीएस/ एमबीए किंवा त्या समकक्ष पदवी पूर्ण केलेली असावी. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कामाचा 15 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. 

29 ऑगस्ट 2023 रोजी 40 वर्षे ते 45 वर्षपर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना अर्जासोबत 750 रुपये शुल्क भरावे लागले. एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. सिनीअर वाइस प्रेसिडंट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक 85 लाखापर्यंत पगार दिला जाणार आहे. 

SBI Bank Job opportunity in State Bank of India Mumbai branch senior vice president Post

तुमच्याकडे अर्जात दिलेली किमान पात्रता आणि अनुभव असेल तर एसबीआयची शॉर्टलिस्टिंग समितीच्या शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्सप्रमाणे पदाच्या गरजेनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांना बोलावण्याचा अधिकार बॅंकेकडे असेल. यासाठी पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची नोंद घ्या. 

गणपतीच्या सुट्टीत नसणार विद्यार्थ्यांची परीक्षा?, शिक्षण विभागाकडून महत्वाची अपडेट

एसबीआयच्या  वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी होणारी मुलाखत 100 गुणांची असेल. मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उतरत्या क्रमाने गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्या. 

किमान पात्रता गुण मिळवलेल्या एकापेक्षा जास्त उमेदवारांची कट-ऑफ गुणांची यादी  त्यांच्या वयानुसार उतरत्या क्रमाने तयार केली जाणार आहे. 

यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले असून 7 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

MRVC Job: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये भरती, पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज

फॅकल्टी, क्रेडिट आर्थिक विश्लेषकची भरती 

स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये ‘फॅकल्टी (कार्यकारी शिक्षण), क्रेडिट आर्थिक विश्लेषक’ही पदे भरली जाणार आहेत. या पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरल्या जातील. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेत ही भरती केली जाणार आहे. यासाठी 29 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. दिलेल्या मुदतीनंतर आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्या. 

HPCL मध्ये बंपर भरती, मुंबईत नोकरी आणि 2 लाखांवर पगार; 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक