Sanjay Raut : राणेंना थेट आव्हान, तुम्ही आमचे काय उखडणार ? - संजय राऊत

Sanjay Raut on Narayan Rane : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातील वाद एकदम टोकाला गेला आहे. ( Political News in Marathi)  

Updated: Jan 7, 2023, 02:14 PM IST
Sanjay Raut : राणेंना थेट आव्हान, तुम्ही आमचे काय उखडणार ? - संजय राऊत title=

Sanjay Raut on Narayan Rane : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातील वाद एकदम टोकाला गेला आहे. ( Political News in Marathi) हा वाद थांबण्याचे नाव घेत नाही. आमच्या नादाला लागू नका, असा इशारा दोघेही एकमेकांना दिसत आहेत. आता तर राणे यांच्या टीकेला राऊत यांनी उत्तर दिले आहे. मी आयुष्यात राणे यांना कधी भेटलो नाही. ठाकरे कुटुंबावर चिखकफेक करणारा हा आहे . आम्ही नाही. सुरुवात कोणी केली. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर टीका करण्याची सुरुवात त्या (नारायण राणे) माणसाने केली. आम्ही केलेली नाही. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याविषयी काय बोलतात? हे सर्वांना माहीत आहे. आज अहोजावो करतोय. मात्र, तुम्ही आमचे काय उखडणार ? हा इशारा आहे, असे संजय राऊत म्हणाले.

... तर उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांना चपलेने मारतील - नारायण राणे

'नारायण राणे लाचार माणूस आहे, 10 पक्ष सोडले'

माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे केंद्रीय मंत्री पद जाणार आहे. परफॉर्मन्स शून्य आहे म्हणून हे सुरु आहे. राणे बाडग्यासारखे वागतायेत. मर्यादा सोडत आहेत.  डरपोक माणसाविषयी विचारु नका, तुम्ही आमचे काय उखडणार, असा थेट सवाल यावेळी राऊत यांनी राणे यांना केला आहे. राणे यांच्या इशाऱ्यानंतर राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. नारायण राणे लाचार माणूस आहे, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले आहे. 10 पक्ष सोडून गेलेला माणूस सर्वाधिक डरपोक आहे असं राऊत म्हणाले. राणेंनी पक्ष सोडल्यावर मी भेटलोच नाही, असं राऊत म्हणाले. 

राऊत शिवसेना डुबवणार, ठाकरे गट 8 ते 10 दिवसांत रिकामा होईल - संजय शिरसाट

 'सरकार अस्तित्वात नाही, गेंड्याच्या कातडीचे...'

राज्यातील सरकार अस्तित्वात नाही. गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अब्दुल सत्तार, उदय सामंत यांची अनेक प्रकरणे काढूनही सरकार पाण्यात बसलेल्या म्हशी सारखं आहे. पूर्वी अंतुले, निलंनगेकर अनेकांनी राजीनामे दिलेत. 6 मंत्र्यांचे पुराव्यासह सादर करुन सुद्धा निगरगट्ट आहेत. सरकारमध्ये दोन गट आहेत, तुम्ही तुमचे बघा. आम्ही आमचे बघू असे सुरु आहे.  2024 च्या आधी परिवर्तन होऊ शकेल. कायदा उल्लंघन करणारे हे सरकार 
वेळ काढू धोरण सुरु आहे. सरकार व्हेंटिलेटरवर आहे. त्यांना माहित आहे की, हे अपत्रा होणार आहेत, असे राऊत म्हणाले.

'शिंदे गटाचा भाजप पक्षात प्रवेश होईल' 

शिवसेना हा एक महावृक्ष आहे. पालपोचळा उडतोय, कचरा साफ होत आहे. मुख्यमंत्री या कचऱ्यासाठी भाषण करतायेत. काही लोक सोडून गेले आहेत, डॅमेज नाही. नवीन असतांना विरोधी पक्ष नेते पद, गटनेता महानगर प्रमुख दिले. तरी त्यांच्या डीएनएचेक केला पाहिजे. लोकांना बेकायदेशीरपणे अडकवले जात आहेत. राज्यकर्त्याने संयमाने वागावे सूडबुद्धीने सर्व काही सुरु आहे. निघून जाणारे बेडूक आहेत. हे सर्व भाजपात जाणार आहेत, आताच सांगतोय. यांना अस्तित्व नाही. आजचे मरण उद्यावर ढकलले जात आहे. हे सर्व अपात्र ठरतील. फेब्रुवारीपर्यंत निर्णय आला तर फेब्रुवारी महिना सरकार बघणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.