Air India : 13 लाख कोटींची कंपनीत नोकरी, वर्षाला 'इतका' पगार.. विमानात लघुशंका करणाऱ्या मिश्राची कुंडली

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून Air India विमानातील सू-सू कांड चांगलंच गाजलं आहे, विमानात महिला प्रवाशावर लघुशंका करणाऱ्या त्या प्रवाशाची ओळख पटली असून त्याला अटक करण्यात आली आहे. 

Updated: Jan 7, 2023, 04:51 PM IST
Air India : 13 लाख कोटींची कंपनीत नोकरी, वर्षाला 'इतका' पगार.. विमानात लघुशंका करणाऱ्या मिश्राची कुंडली title=

Air India Peeing Incident : एअर इंडियातील सू सू कांड गेल्या दोन तीन दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. एअर इंडियाच्या विमानात एका व्यक्तीने महिला प्रवाशावर लघुशंका केल्याचं हे प्रकरण होतं. 26 नोव्हेंबरला एअर इंडियाच्या पॅरिस-दिल्ली विमान (Paris-Delhi) प्रवासात मद्यधुंद (alcohol) अवस्थेतील प्रवाशाने महिला प्रवाशावर लघुशंका केली. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या व्यक्तिला बंगळूरुमधून (Bangalore) अटक करण्यात आली आहे.  

लघुशंका करणारा उच्चपदस्थ
लघुशंका करणाऱ्या या प्रवाशाचं नाव शंकर मिश्रा असं आहे. शंकर मिश्रा हा Wells Fargo या मल्टिनॅशनल कंपनीत व्हाईस प्रेसिडंट पदावर काम करतो. ही कंपनी फायनानशिअल सर्व्हिसेस कॉर्पोरेशनशी संबंधीत काम करते. शंकर मिश्रा ज्या पदावर काम करतो त्यासाठी त्याला अनेकवेळा विमान प्रवास करावा लागतो. पण विमानातील प्रकरणानंतर शंकर मिश्रा याला कंपनीने निलंबित केलं आहे. 

शंकर मिश्राला होता इतका पगार
शंकर मिश्रा हा ज्या Wells Fargo या मल्टिनॅशनल कंपनीत व्हाईस प्रेसिडंट पदावर काम करतो त्या पदासाठी 51 लाख ते 96 लाख इतका पगार मिळतो. एका माहितीनुसार शंकर मिश्रालाही 51 ते 96 लाख दरम्यान पागर होता, त्यामुळे त्याचा रुबाबही मोठा होता. शंकर मिश्रा ज्या Well Fargo कंपनीत काम करत होता, त्या कंपनीचं हेरक्वाटर कॅलिफॉर्नियामध्ये आहे. 1852 साली स्थापन झालेल्या या कंपनीचं बाजारमूल्य जवळपास 161.64 डॉलर म्हणजे भारतीय चलनात जवळपास 13 लाख कोटी इतकं आहे. 

विमानात नेमकं काय घडलं होतं?
26 नोव्हेंबरला एक महिला प्रवासी न्यूयॉर्कवरुन दिल्लीला (New York To Delhi Flight) जाणाऱ्या विमानातून प्रवास करत होती. ती बिझनेक क्लासमध्ये बसली आहे. फ्लाईट AI-102 हे विमान दुपारी एक वाजता न्यूयॉर्कच्या जेएफके विमानतळावरुन रवाना झालं. काही वेळ वातावरण शांत होतं. पण विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच नशेत असलेला एक प्रवाशी एका महिलेच्या सीटजवळ गेला आणि पँटची झीप उघडून त्याने महिलेवर लघुशंका केली.

शंकर मिश्रावर विमान प्रवासाला बंदी
26 नोव्हेंबरला घडलेल्या या घटने प्रकरणी एअर इंडियाकडून पोलिसांत तक्रार (Police Complaint) दाखल करण्यात आली. त्यानंतर एअर इंडिया व्यवस्थापन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार एका समितीचीही स्थापना करण्यात आली. आक्षेपार्ह वर्तणूक करणाऱ्या प्रवाशाला नो फ्लाई लिस्टमध्ये टाकण्याची शिफारस करण्यात आली असून त्याच्यावर 30 दिवसांची बंदी घालण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे महिलेने विमानातल्या कर्मचाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरही एअर इंडियातल्या कर्मचाऱ्यांनी (Cabin Crew) या प्रवाशावर कोणतीही कारवाई केली नव्हती. कारवाई न झाल्याने महिलेने थेट टाटा ग्रुपचे (Tata Group) चेअरमन एन चंद्रशेखरन यांना पत्र पाठवून तक्रार केली. आता एअर इंडियाने 5 कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली आहे.