शिपायावर केंद्रीय तपास यंत्रणा रेड टाकतील; खोटे गुन्हे आणि खोटे पुरावे तयार करतात - संजय राऊत

Sanjay Raut On IT raid on Yashwant Jadhav's house : शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना टोला लगावला आहे. 

Updated: Feb 25, 2022, 11:42 AM IST
शिपायावर केंद्रीय तपास यंत्रणा रेड टाकतील; खोटे गुन्हे आणि खोटे पुरावे तयार करतात - संजय राऊत title=

मुंबई : Sanjay Raut On IT raid on Yashwant Jadhav's house : शिवसेना नेते आणि मुंबई पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला. यावर शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना टोला लगावला आहे. आता महापालिकेच्या शिपायावरही केंद्रीय तपास यंत्रणा रेड टाकतील, असे  राऊत म्हणाले. तसेच खोटे गुन्हे दाखल करतात, खोटे पुरावे तयार करतात असा आरोपही त्यांनी यावेळी केला. (IT raid on Yashwant Jadhav's house, Central Investigation Agency raids Peon; Creates False Crimes and False Evidence - Sanjay Raut)

शिवसेने नेते आणि महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली. पहाटेच अधिकारी यशवंत जाधव यांच्या माझगावमधील घरी पोहोचले आणि चौकशी सुरु केली आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई केली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अधिक माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, राज्यातल्या डर्टी डझनममध्ये मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव, महापौर किशोरी पेडणेकर यांचा समावेश आहे, अशी टीका किरीट सोमय्यांनी केलीय. यामिनी जाधव यांनी निवडणूक फॉर्म भरताना संपत्ती दडवली असा आरोप सोमय्यांनी केला आहे. तर महापालिका निवडणुका आल्या आहेत. आता महापालिकेच्या शिपायावरही केंद्रीय तपास यंत्रणा रेड टाकतील, असा टोला संजय राऊत यांनी मारला. 

महिन्याभरात महापालिका निवडणुका आहेत. निवडणुची प्रक्रिया सुरु होईल. त्यामुळे महापालिकेच्या शिपायांवरही धाड टाकतील, कारण ते खिशाला धनुष्यबाण लावतात. मराठी लोकं आहेत त्यामुळे ते लावत असतात. त्यांच्यावरही हे धाड टाकू शकतात, असे राऊत म्हणाले. 

2024 पर्यंत हे आम्हाला आणि महाराष्ट्राला देखील सहन करायचा आहे पश्चिम बंगाल झारखंड पंजाब यांना देखील सहन करायचं आहे ते 2024 नंतर बघू, असे राऊत म्हणाले.